ग्रंथदिंडी उत्साहात
By Admin | Updated: July 26, 2014 00:39 IST2014-07-26T00:21:00+5:302014-07-26T00:39:48+5:30
लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
ग्रंथदिंडी उत्साहात
लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शुक्रवारी शहरातील टाऊन हॉल मैदानापासून दयानंद महाविद्यालयातील संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली़
साहित्य संमेलनाचे उद्घाटन दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी होणार आहे. दरम्यान, ग्रंथदिंडीचे उद्घाटन संस्कारवर्धिनीचे सचिव विजय दबडगावकर, साने गुरूजी शैक्षणिक संकुलाचे सचिव कालिदास माने, ज्ञानप्रकाश प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश नरहरे, संमेलनाचे निमंत्रक विकास पाटील, शरद कोरे, राजकुमार काळभोर, दशरथ यादव, ज्ञानेश्वर पतंगे, सतीश मडके, नयन राजमाने यांच्या उपस्थितीत करण्यात आले़ दिंडीची सुरूवात टाऊन हॉल येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली़ दिंडीत संस्कारवर्धिनी विद्यालय, साने गुरूजी शैक्षणिक संकुल, महात्मा फुले विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, गोदावरी कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा यासह शहरातील दहा शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीत सहभाग घेतला असून या दिंंडीचा समारोप दयानंद सभागृहातील संमेलनस्थळी करण्यात आला़
विद्यार्थी आणि नवोदित साहित्यिक ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंबेडकर पार्क येथून दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहासमोर या ग्रंथदिंडीचा समारोप झाला. शनिवारी सकाळी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. (प्रतिनिधी)