ग्रंथदिंडीने लातूरकरांचे लक्ष वेधले़़़

By Admin | Updated: February 2, 2015 01:13 IST2015-02-02T01:06:31+5:302015-02-02T01:13:27+5:30

लातूर : शिक्षक काँग्रेस, मराठवाडा साहित्य परिषद व संस्थाचालक संघटनेच्या दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलना निमित्त रविवारी सकाळी

Glandadindee pointed out Latukar | ग्रंथदिंडीने लातूरकरांचे लक्ष वेधले़़़

ग्रंथदिंडीने लातूरकरांचे लक्ष वेधले़़़


लातूर : शिक्षक काँग्रेस, मराठवाडा साहित्य परिषद व संस्थाचालक संघटनेच्या दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलना निमित्त रविवारी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली़ आंबेडकर पार्क येथून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला़ विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, ह़भ़प़ रामकृष्ण महाराज भिंगोलीकर यांच्या हस्ते राज्यघटना व तुकारामाच्या गाथेचे पूजन करण्यात आले़
ग्रंथदिंडीत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ विविध कलागुणांचे सादरीकरण करीत ग्रंथदिंडी संमेलन स्थळाकडे आली़ आदीवासी नृत्य, झांज पथक, लेझिम पथकाचे सादरीकरण कलावंतांनी ग्रंथदिंडीतून केले़ ग्रथंदिंडीत सर्वात पुढे ज्ञानसंवर्धन मॉर्डन इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत विठ्ठल विठ्ठल नामाचा ठेका धराला. या सादरीकरणातून प्रेक्षकांचे लक्ष वेधले़ जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक लेझीमच्या तालावर ठेका धरत पुढे पुढे चालत होते़ साने गुरुजी प्राथमिक विद्यालयातील मुलांचा लेझीम संघ लेझीम खेळत पुढे चालत होता़ नंदादीप माध्यमिक विद्यालय, भैरवनाथ प्राथमिक विद्यालय, विद्यार्थ्यांच्या हातात पाणी वाचवा, पाण्याचा योग्य वापर करा़ झाडे लावा झाडे वाचवा़ स्वच्छ लातूर , सुंदर लातूर, रक्तदान श्रेष्ठदान, घेऊ नका आमचा बळी, मी आहे उमलणारी कळी, असे फलक लक्षवेधी होते़ नुकतेच दिल्लीतील प्रजासत्ताकदिनाच्या संचालनातही महाराष्ट्राचा वारकऱ्यांचा देखावा प्रथम आला़ त्याच देखाव्याची प्रचिती या या ग्रंथदिंडीत आली़ वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधीत्व करणारे वारकऱ्यांच्या भूमिकेतही अनेक विद्यार्थी होते़ वारकऱ्यांची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदांगावर ठेका धरला होता़ कमरेवर दोन्ही हात ठेवून साक्षात विठ्ठलाच्या रुपातही विद्यार्थी आले होते़ मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन व ग्रंथगाथा घेतली होती़ स्व़ विलासराव देशमुख यांचे मोठ-मोठे कटआऊट ग्रंथ दिंडीचे आकर्षण होते़
सकाळी १०़ ३० ला निघालेली ग्रंथदिंडी दुपारी १ च्या सुमारस संम्मेलनस्थळी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आली़
-कवी सम्मेलन हॅलो २ वर

Web Title: Glandadindee pointed out Latukar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.