अर्ध्या वाटेतच विद्यार्थ्यांना दिले उतरवून
By Admin | Updated: March 20, 2017 23:22 IST2017-03-20T23:21:12+5:302017-03-20T23:22:31+5:30
अंबड : अंबड तालुक्यातील एसटीने प्रवास करणारे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात सहा व अन्य पास धारक विद्यार्थ्यांना अर्ध्या वाटेतच उतरविण्याचा गंभीर प्रकार सोमवारी झिरीप पाटीवर घडला.

अर्ध्या वाटेतच विद्यार्थ्यांना दिले उतरवून
अंबड : अंबड तालुक्यातील एसटीने प्रवास करणारे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात सहा व अन्य पास धारक विद्यार्थ्यांना अर्ध्या वाटेतच उतरविण्याचा गंभीर प्रकार सोमवारी झिरीप पाटीवर घडला.
बस (क्र. ८६६४) अंबड ते डोणगाव या गाडीतील वाहक महिलेने पेपर सुरु होण्याच्या अर्धा तास आधीच परीक्षा केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. त्यामुळे विद्यार्थाचे कडक उन्हात प्रचंड हाल झाले. हे सर्व प्रकार अंबड आगरासाठी नवीन नाहीत. गत आठवड्यात एका विद्यार्थिनीला विद्यार्थी पास देण्याऐवजी प्रवासी पास देऊन आर्थिक पिळवणूक करण्यात आली. दुष्काळ आणि गरिबी आशा अनेक समस्यांना तोंड देत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकत असतात पण त्यांनी शिक्षण घेऊन नये असा संदेश अंबड आगार देत असल्याचे दिसून येते. अंबड आगाराने सदर महिला वाहकाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकांतून होत आहे. (वार्ताहर)