११ लाख रुपयांचे सोयाबीन केले हस्तगत
By Admin | Updated: July 13, 2014 00:29 IST2014-07-12T23:49:55+5:302014-07-13T00:29:11+5:30
सेनगाव : बनावट नंबर प्लेट लावून ११ लाख १४ हजार रुपये किमतीचे सोयाबीन लंपास केल्याच्या प्रकरणाचा सेनगाव पोलिसांनी पूर्णत: छडा लावला असून यातील २७५ पोते सोयाबीन शनिवारी ताब्यात घेतले आहे.

११ लाख रुपयांचे सोयाबीन केले हस्तगत
सेनगाव : बनावट नंबर प्लेट लावून ११ लाख १४ हजार रुपये किमतीचे सोयाबीन लंपास केल्याच्या प्रकरणाचा सेनगाव पोलिसांनी पूर्णत: छडा लावला असून यातील २७५ पोते सोयाबीन शनिवारी ताब्यात घेतले आहे.
३ जुलै रोजी सेनगाव येथील आडत व्यापाऱ्याला गंडविण्यात आले. ट्रकला बनावट नंबर प्लेट लावून ११ लाख १४ हजार रुपये किमतीचे सोयाबीन लंपास झाले. याप्रकरणी सेनगाव पोलिसांत चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा सपोनि बाळाजी येवते यांनी यशस्वी तपास करीत ४८ तासांच्या आत या प्रकरणात वापरण्यात आलेल्या ट्रकसह तीन जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून लंपास करण्यात आलेला सोयाबीनचा उलगडा झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथून या प्रकरणातील सोयाबीन शनिवारी हस्तगत करीत सेनगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी येवते यांनी दिली. बनावट नंबरचा ट्रक वापरून व्यापाऱ्यांना गंडा घालण्याच्या या प्रकाराचा पूर्णत: तपास झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असले तरी मुद्देमाल शोधण्यात पहिल्यांदाच काही दिवसानंतर सेनगाव पोलिसांना यश मिळाले आहे.