ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता अन्य समाजाला आरक्षण द्या - प्रा. वीरकर
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:42+5:302020-12-04T04:08:42+5:30
प्रा. वीरकर म्हणाले की, ओबीसी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तज्ज्ञ वकील नेमावा, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ...

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता अन्य समाजाला आरक्षण द्या - प्रा. वीरकर
प्रा. वीरकर म्हणाले की, ओबीसी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तज्ज्ञ वकील नेमावा, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थांची शिष्यवृत्ती देण्यात यावी, एमपीएससीच्या परीक्षाही शासनाने त्वरित घ्याव्यात अशी मागणी करीत ओबीसी समाजाचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही, हे स्पष्ट केले.
बैठकीचे आयोजन समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि शहराध्यक्ष पुंडलिक गायकवाड यांनी केले होते. या बैठकीला विविध ओबीसी संघटनांचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. दशरथ बनकर, काशिनाथ गायकवाड, आबा जेजुरकर, जगन गायकवाड, दत्तात्रय क्षीरसागर, ज्ञानेश्वर आदमाने, बाबासाहेब गायकवाड, हेमराज जगताप, शरद खैरनार, दौलत गायकवाड, अशोक पवार, भगतसिंग राजपूत, समीर लोंढे, निवृत्ती सोनवणे, कैलास वेळजकर, सुनील गायकवाड, प्रवीण साखरे, सचिन जानेफळकर, अरविंद शेवाळे, दिलीप अनर्थो, राजू आहेर, रतिलाल गायकवाड, दादासाहेब क्षीरसागर, दिगंबर गायकवाड, संतोष तागड, बाळासाहेब शेवाळे, गणेश चांगले, ज्ञानेश्वर घोडके, भगवान गायकवाड, अशोक दारुंटे, शरद खैरनार, तात्या गायकवाड, पवन राजपूत, कुणाल जगताप, अशोक देवकर, चांगदेव उघडे यांची उपस्थिती होती. जगन्नाथ गायकवाड यांनी आभार मानले. ७ डिसेंबर रोजी वैजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.