वृद्ध शेतकऱ्यांना ३ हजार रूपये पेन्शन द्या़
By Admin | Updated: September 5, 2014 00:57 IST2014-09-05T00:39:43+5:302014-09-05T00:57:05+5:30
लातूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला़

वृद्ध शेतकऱ्यांना ३ हजार रूपये पेन्शन द्या़
लातूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला़ यावेळी मोर्चेकऱ्यांनी ६० वर्षे वयाच्या शेतकऱ्यांना ३ हजार रूपये पेन्शन देण्याची मागणी केली़
शेतकरी संकटात असल्यामुळे शासनाने मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी, राष्ट्रीय कृषी आयोगावर ५० टक्के शेतकरी प्रतिनिधी घ्यावेत, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़ यावेळी कॉ़ गंगाधर गुणाले, अविनाश पागे, भारत हत्ते, भिमसिंग ठाकूर, विश्वनाथ इंद्राळे, देविदास पाटील, हमजादमियाँ देशमुख, पुठ्ठेवाड गुरुजी, रामराव हंगरगे, अच्युत दळवे, काशिनाथ केंद्रे, विठ्ठल चंदावार आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती़
मराठवाड्यात दुबार पेरणी झाली़ राज्य शासनाने एकाही शेतकऱ्याला मदत केली नाही़ बहुतांश भागातील पिके वाळून गेली़ ग्रामीण भागात अनेक गावात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव कॉ़ राजीव पाटील यांनी यावेळी केला़ शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे़