शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दागिने द्या; पावडरने चमकवून देतो ! १५ तोळ्यांचे अलंकार भामट्यांनी ढापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:00 IST

जवाहरनगर, एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हे दाखल

औरंगाबाद : आमच्याकडे एक पावडर आहे. त्या पावडरने घरातील फरशी, भांडी अतिशय स्वच्छ निघतात, अशी थाप मारत वृद्ध महिलांना गंडविल्याच्या घटना बुधवारी दुपारी जवाहरनगर, चिकलठाणा हद्दीत घडल्या. यात दोन ठिकाणांहून भामट्यांनी १५ तोळे सोने लंपास केले. याप्रकरणी जवाहरनगर व एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे नोंदविले आहेत. दोन्ही घटनांतील आरोपी एकच असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सुशीला दाशरथे (८२, रा. लोकमित्र पोलिस कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी सकाळी साडेदहा वाजता दोन व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. त्यांनी आमच्याकडे उजाला पावडर असून, त्याने फरशी स्वच्छ होते, असे सांगितले. तेव्हा सुशीला यांची सूनही घरी होती. भामट्यांनी दागिनेही स्वच्छ केले जात असल्याची थाप मारली. त्यानुसार सुशीला यांनी देव्हाऱ्यातील चांदीचे भांडे मागविल्यानंतर ते त्यांनी स्वच्छ करून दिले. त्यानंतर घरातील दागिन्यांना पॉलिशही करून देतो, असे सांगितले. तेव्हा सुशीला यांनी हातातील ५ तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, अडीच तोळ्याची चेन, सुनेचे एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि ५ ग्रॅमची अंगठी असे ९ तोळे सोने भामट्यांकडे दिले. त्यांनी सर्व दागिने एका कुकरमध्ये ठेवून स्वच्छ केल्याचा बहाणा करून ते पसार झाले. कुकर उघडून पाहिल्यानंतर त्यात दागिने नव्हते. तेव्हा भामट्यांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करत आहेत.

अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्याची थापदुसरी घटना विमानतळासमोर घडली. निवृत्त शिक्षकाच्या पत्नी सुनीता अशोक कांगणे यांच्या घरी भामटे बुधवारी दुपारी गेले. अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून, माझ्याकडे पितळी तांब्याचे भांडे चमकविण्याची पावडर आहे. तुम्हाला भांडे चमकवून दाखवतो, असे सांगितले. त्यानुसार सुनीता यांना भांडे चमकवून दाखविल्यानंतर दुसऱ्याने सोन्याचे दागिनेही चमकविण्याची पावडर असल्याचे सांगितले. त्यानुसार सुनीता यांनी दोन तोळ्यांची पोत, चार तोळ्यांच्या पाटल्या दिल्या. त्यांनी सुनीता यांना घरात हळद आणण्यासाठी पाठवले. त्या आत जाताच भामट्यांनी सोने घेऊन धूम ठोकली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास सपोनि. शिवाजी चौरे करत आहेत.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी