जिल्ह्यात मागेल त्याला काम द्या
By Admin | Updated: January 15, 2016 23:44 IST2016-01-15T23:40:59+5:302016-01-15T23:44:07+5:30
परभणी : मागेल त्याला काम देण्यात यावे. उपलब्ध कामांबाबत गावागावात माहिती देऊन मजुरांना कळवावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव एस. एस. संधू यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यात मागेल त्याला काम द्या
परभणी : रोजगार हमी योजनेअंतर्गत आगामी पाच महिन्यांच्या कालावधीत मागेल त्याला काम देण्यात यावे. उपलब्ध कामांबाबत गावागावात माहिती देऊन मजुरांना कळवावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव एस. एस. संधू यांनी अधिकाऱ्यांना दिले.
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईस्थिती संदर्भात १५ जानेवारी रोजी आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी संभाजी झावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंमरे, महापालिका आयुक्त राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नियोजन अधिकारी पतंगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
संधू म्हणाले, आगामी पाच महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई भासू नये, यासाठी सर्व संबंधित विभाग व यंत्रणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवून ग्रामस्थ व नागरिकांना दिलासा द्यावा. आधार कार्ड नोंदणीचे काम नियोजन पद्धतीने करुन गावात जनजागृती करावी, जिल्हा नियोजन अंतर्गत प्रस्तावित निधी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी वेळेत खर्च करावेत. कोणत्याही स्थितीत निधी परत जाणार नाही, याची दक्षता बाळगावी, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)