उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून गुरव पुजाऱ्यांना आर्थिक पॅकेज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:02 IST2021-04-09T04:02:21+5:302021-04-09T04:02:21+5:30
यासंदर्भात रामनाथ कापसे, रोहिणी शेवाळे, डॉ. जयश्री काळे, मंगल काळे, कांता बचाटे, रवींद्र साळुंके, मीना साळुंके, नीलेश बचाटे, रावसाहेब ...

उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून गुरव पुजाऱ्यांना आर्थिक पॅकेज द्या
यासंदर्भात रामनाथ कापसे, रोहिणी शेवाळे, डॉ. जयश्री काळे, मंगल काळे, कांता बचाटे, रवींद्र साळुंके, मीना साळुंके, नीलेश बचाटे, रावसाहेब घुगे, सोमनाथ पवार, माधुरी शिंदे, संगीता डवले, पुंडलिक सोनवणे, सर्वेश्वर वाघमारे आदींनी म्हटले आहे की, राज्यामध्ये पुन्हा एकदा करोना महामारीचा उद्रेक झाला असून, कडक निर्बंधांमुळे रोजगार, व्यवसाय, ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आर्थिक घडी विस्कळीत होत आहे. प्रार्थना स्थळे, मंदिरे बंद झाल्याने पुजारी वर्ग संकटात सापडला आहे. गतवर्षीही बारा बलुतेदारांना व पुजारी वर्गाला कुठलेही आर्थिक पॅकेज दिले गेले नाही. आज या पुजारी वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
..