‘दसºयापूर्वीच संपूर्ण कर्जमाफी द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:36 IST2017-09-12T00:36:10+5:302017-09-12T00:36:10+5:30
दसºयापूर्वीच शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला.

‘दसºयापूर्वीच संपूर्ण कर्जमाफी द्या’
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दसºयापूर्वीच शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकरी आंदोलन समिती व शिवसेनेने शेतकºयांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभर लढा उभारला आहे. राज्य सरकारने शेतकºयांना दीड लाख रुपये कर्जमुक्ती दिलेली आहे; परंतु याचा कोणताच ठोस फायदा शेतकºयांना होताना दिसत नाही. म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा नगर रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चात जिल्हा प्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, माजी मंत्री बदामराव पंडित, जि.प. सभापती युधाजित पंडित, मकरंद उबाळे, उल्हास गिराम, रत्नाकर शिंदे, विनायक मुळे, विनायक ढगे, सतीश सोळंके, वैजनाथ सोळंके, अजय दाभाडे, व्यंकटेश शिंदे, विनोद राऊत, के.के. वडमारे, बाळासाहेब अंबुरे, जयसिंग चुंगडे, सुशील पिंगळे, गणेश घुंबर्डे, प्रवीण मुळूक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी यांचा मोठा संख्येने सहभाग होता. मोर्चासाठी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. दरम्यानच्या काळात मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली.