शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नाचे पैसे दिले पाण्यासाठी..!

By admin | Updated: February 2, 2016 00:24 IST

बदनापूर : तालुक्यातील पाडळी येथील पाणीप्रश्न कायमचा मिटावा याकरीता ठाणे येथील एका उद्योगपतीने आपल्या मुलीच्या लग्नाचे पैसे देणगी म्हणून दिले आहेत.

बदनापूर : तालुक्यातील पाडळी येथील पाणीप्रश्न कायमचा मिटावा याकरीता ठाणे येथील एका उद्योगपतीने आपल्या मुलीच्या लग्नाचे पैसे देणगी म्हणून दिले आहेत.तालुक्यातील पाडळी गावाला दरवर्षी पिण्याची पाणीटंचाई जाणवते. यावर प्रशासनाने अद्याप कायमस्वरूपी पर्याय काढला नसला तरी ठाणे येथील उद्योगपती डॉ. विवेक वडके व त्यांच्या पत्नी वासंतीताई यांनी आपल्या मुलीचे लग्न अत्यंत साधेपणाने केले. त्यामधील बचतीचे तीन लाख रुपये पाडळी गावाच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दिले. यावेळी डॉ. वडके यांनी या गावाच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करण्यास सदैव तत्पर राहील, असे आश्वासन दिले. यावेळी विनय काकडे यांनी हे गाव तालुक्यात आदर्श गाव करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास सुहास पोहनेरकर, परेश रुणवाल, मकरंद चांदोडकर, मनोज पित्ती, कमलेश कुकडेजा, संतोष गिल्डा, लक्ष्मीकांत खंडेलवाल, सरपंच सत्यशिला सिरसाट, उपसरपंच स्वाती शेळके, ग्रा.पं सदस्य तातेराव सिरसाट, सविता शेळके, कुशवर्ता कांबळे, भगवानराव शेळके व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा सिरसाट, सूत्रसंचालन अनिल शेळके यांनी, तर आभार प्रदर्शन रामेश्वर सिरसाट यांनी केले. डॉ. विवेक वडेक यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. (वार्ताहर)