तरुणींना उच्चशिक्षित, सुस्वभावी जोडदार हवा
By Admin | Updated: March 14, 2016 00:52 IST2016-03-14T00:47:09+5:302016-03-14T00:52:39+5:30
औरंगाबाद : तरुणांना आपली जोडीदार सुस्वभावी, समजदार व सिंपल अँड सोबर असावी,

तरुणींना उच्चशिक्षित, सुस्वभावी जोडदार हवा
औरंगाबाद : विवाहेच्छुक तरुणींना जोडीदार उच्चशिक्षित असावा, तो निर्व्यसनी असावा, कोणी नोकरी करणारा तर कोणी व्यावसायिक असावा, असे वाटते तर तरुणांना आपली जोडीदार सुस्वभावी, समजदार व सिंपल अँड सोबर असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. उल्लेखनीय म्हणजे या वधू-वरांनी भावी जोडीदाराबद्दल आपले विचार आत्मविश्वासाने मांडले.
अखिल भारतीय पुलक जैन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सकल दिगंबर जैन युवक-युवती परिचय संमेलन रविवारी घेण्यात आले. स्टेशन रोडवरील भानुदास चव्हाण सभागृहात महाराष्ट्रच नव्हे तर परप्रांतातूनही युवक-युवती व त्यांचे पालक जमा झाले होते. व्यासपीठावर विवाहेच्छुकांना आमंत्रित करण्यात येत होते. तरुणींनी उच्चशिक्षित व निर्व्यसनी जोडीदार असावा, यावर भर दिला. तर तरुणांनी सुस्वभावी, समजदार जोडीदार असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यात काही मुली डॉक्टर, इंजिनिअर होत्या. त्यांनी आपल्या क्षेत्रातीलच मुलगा असावा, यावर भर दिला. काही तरुणींनी सुंदर जोडीदार असावा असे म्हटले तर तरुणींनी अनुरूप जोडीदार असावा, अशी भावना व्यक्त केली. व्यासपीठावर न अडखळता विवाहेच्छुक आत्मविश्वासाने अपेक्षा व्यक्त करीत होते. यानिमित्ताने सर्वांना माहिती पुस्तिका देण्यात आली. पालक आपल्या मुला-मुलींसाठी पुस्तिकेतील अनुरूप स्थळ शोधण्यात मग्न झाले होते. प्रारंभी मंगलाचरण सपना पापडीवाल यांनी म्हटले. उद्घाटन सत्रात व्यासपीठावर तीर्थरक्षा कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कासलीवाल, ललित पाटणी, डी. बी. कासलीवाल, माणिकचंद गंगवाल, विजयकुमार पाटणी, महावीर पाटणी, शांतीलाल पाटणी, जितेंद्र पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यासाठी अरुण पाटणी, मोहित पहाडे, पारस गोधा, प्रसाद पाटणी, अनिल पाटणी, संतोष पापडीवाल, प्रकाश अजमेरा, सुनील पांडे, दिलीप कासलीवाल आदींनी परिश्रम घेतले.