वसतिगृहातील मुलींची पोलीस ठाण्यात धाव
By Admin | Updated: April 4, 2017 23:12 IST2017-04-04T23:08:51+5:302017-04-04T23:12:52+5:30
लातूर : सामाजिक न्याय विभागाचे विस्तारित एमआयडीसीत एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहातील मुलींना अनेक दिवसांपासून छेडछाडीला सामोरे जावे लागत आहे

वसतिगृहातील मुलींची पोलीस ठाण्यात धाव
लातूर : सामाजिक न्याय विभागाचे विस्तारित एमआयडीसीत एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहातील मुलींना अनेक दिवसांपासून छेडछाडीला सामोरे जावे लागत आहे. अखेर त्यांनी पोलीस ठाणे गाठून आठ जणांविरुद्ध मंगळवारी तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
विस्तारित एमआयडीसीत एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह असून, या वसतिगृहातील काही मुले मुलींची छेड काढतात. वसतिगृह अधीक्षकांनी वारंवार समजावून सांगूनही त्यात सुधारणा झाली नाही. ही छेडछाड गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर या छेडछाडीला कंटाळून वसतिगृहातील त्रस्त मुलींनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या प्रकरणी प्रदीप सुरवसे, किरण गोरे, सातपुते, विशाल कांबळे, जीवन जोंधळे, शुभम कांबळे यांच्यासह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे.