मुलीच्या मृत्यूस कारणीभूत महिला फरार

By Admin | Updated: June 28, 2016 00:58 IST2016-06-28T00:39:38+5:302016-06-28T00:58:17+5:30

औरंगाबाद : शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीला बदनामी करण्याची धमकी देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको

The girl who escaped the death of the girl absconded | मुलीच्या मृत्यूस कारणीभूत महिला फरार

मुलीच्या मृत्यूस कारणीभूत महिला फरार


औरंगाबाद : शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीला बदनामी करण्याची धमकी देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपी महिला घटनेपासून फरार झाली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.
ब्रिजवाडी येथील रहिवासी सुदाम गायकवाड यांची १६ वर्षीय मुलगी दीपाली हिने ७ जून रोजी राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलीस चौकशीदरम्यान शेजारी राहणारी कुसुम दिलीप काळे या महिलेने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करून तुझे एका मुलाशी लफडे आहे, असा आरोप करीत तुझी बदनामी करते, अशा प्रकारे धमकावले होते. तिच्या त्रासाला कंटाळूनच आपल्या मुलीने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार सुदाम यांनी नोंदविली होती. घटनेपासून आरोपी महिला फरार झाली आहे. असे असले तरी आरोपी महिलेकडून तक्रार मागे घेण्यासाठी तिच्या वडिलांवर दबाव आणून धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबतचे निवेदन सुदाम गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.

Web Title: The girl who escaped the death of the girl absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.