शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने दाखवलं धाडस, एकास घेतला चावा; रस्ता न सापडल्याने कार सोडून पळाले अपहरणकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:15 IST

अपहरणकर्त्यांच्या कारमध्ये बनावट नंबर प्लेटचा साठा, बीअरच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्चा, काळे मास्क व मोठ्या आकाराचा स्कार्फ सापडला.

छत्रपती संभाजीनगर: क्रिस्टल वाइन शॉपसमोर नेहाला ( नाव बदलेले आहे) सोडल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कार महावितरणच्या कार्यालयाकडून तुळजाभवानी चौकातून भारतनगरच्या दिशेने नेली. मात्र, साराराजनगरमध्ये अरुंद गल्लीबोळांत रस्ताच संपल्याने कार पुढे नेण्यास दिशाच सापडली नाही. परिणामी, कार तशीच सोडून त्यांनी पळ काढला. 

८०० मीटरमधील धरारगारखेड्यातील नाथ प्रांगणापासून ५०० मीटर अंतरावरील वाइन शॉपसमोर अपहरणकर्त्यांनी नेहाला सोडून पोबारा केला. पुढे ३०० मीटर अंतरावर साराराजनगरमध्ये त्यांना कार सोडून पोबारा करावा लागला. एकूण ८०० मीटर अंतरात हा नाट्यमय थरार घडला.

कारमध्ये बीअर, मास्क, स्कार्फअपहरणकर्त्यांच्या कारमध्ये बनावट नंबर प्लेटचा साठा, बीअरच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्चा, काळे मास्क व मोठ्या आकाराचा स्कार्फ सापडला. झटापटीत चाकू लागल्याने सीट रक्ताने माखले होते. कारचा क्रमांक बनावट लावून, त्यावरील शेवटचे दोन क्रमांक खोडण्यात आले होते, कार जवळपास तीन वेळा विकली आहे. कारच्या मूळ मालकाचा पत्ता पुण्यातील असून, तिसरा खरेदीदार शहरातीलच असल्याचे पोलिसांनी सांगितले. दीड महिन्यांपूर्वीच त्याने कार खरेदी केली आहे.

धीट नेहा : आजोबांचा नंबर १००, वडील पोलिसनेहाला आपले अपहरण झालेय, हे समजले होते. मात्र, धीट नेहा डगमगली नाही. अपहरणकर्त्यांनी कारमध्ये नेहाला तिच्या आजोबांचा मोबाइल क्रमांक मागितला. तिने मात्र पोलिसांचा नियंत्रण कक्षाचा क्रमांक १०० सांगितला. वडिलांविषयी विचारल्यावर वडील पोलिस असल्याचे सांगितले. यामुळे अपहरणकर्तेही भांबावले. नेहाने एका अपहरणकर्त्याच्या हाताला कडकडून चावाही घेतला.

चालक छेडे दहा वर्षांपासून कुटुंबासोबतनेहाच्या आजोबांनी नियुक्त केलेले चालक नवनाथ छेडे यांनी जीवाची पर्वा न करता अपहरणकर्त्यांना विरोध करत नेहाला सोडवण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षापासून ते त्यांच्यासाठी नोकरी करतात. त्यांच्या घराखाली ते कुटुंबासह राहतात.

वरिष्ठ पोलिसांची धाव, सहा पथके रवानामुलीच्या अपहरणामुळे पोलिस विभागही हादरला. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक कृष्णा शिंदे, गुन्हे शाखेचे संभाजी पवार, सायबर पोलिस ठाण्याचे शिवप्रसाद पांढरे यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सहा पथकांना तपासाची जबाबदारी निश्चित करून रवाना करण्यात आले.

चैतन्य तुपे अपहरणाच्या घटनेची पुनरावृत्तीफेब्रुवारीत एन-४ मधील चैतन्य तुपे या चिमुकल्याच्या अपहरणाने शहर हादरले होते. पुन्हा बनावट नंबर प्लेट, कारमध्ये खोट्या नंबर प्लेटचा साठा, सायंकाळच्या वेळीच अपहरणाच्या घटनेच्या पुनरावृत्तीने सर्वच अचंबित झाले.

व्यवसाय, कौटुंबिक पार्श्वभूमीच्या अनुषंगाने तपासघटनेमुळे हादरलेल्या पोलिसांनी सर्व दिशांनी तपास सुरू केला. नेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी, आजोबांच्या व्यवसायाची माहिती घेतली.-शिवाय, सायबर पोलिसांकडून तांत्रिक पद्धतीने विश्लेषण सुरू करण्यात आले.-अपहरणकर्त्यांना नेहाच्या ट्यूशनची वेळ माहीत होती. विशेष म्हणजे, बुधवारी नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा ट्यूशन सुटूनही अपहरणकर्ते तेथे दाखल झाले. त्यामुळे ते नेहाच्या मागावर होते, असा दाट संशय पाेलिसांना आहे. मात्र, त्यांना रस्त्याची नीटशी माहिती नसल्याचेही स्पष्ट झाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण