भोकरदन शहरातून विवाहितेसह मुलगी गायब
By Admin | Updated: July 15, 2016 00:45 IST2016-07-15T00:21:22+5:302016-07-15T00:45:40+5:30
भोकरदन : शहरातील वीस वर्षीय नवविवाहितेसह अल्पवयीन मुलगीगायब झाल्यामुळे शहरात हा एक चर्चेचा विषय झाला आहे़

भोकरदन शहरातून विवाहितेसह मुलगी गायब
भोकरदन : शहरातील वीस वर्षीय नवविवाहितेसह अल्पवयीन मुलगीगायब झाल्यामुळे शहरात हा एक चर्चेचा विषय झाला आहे़
तालुक्यातील २० वर्षीय तरूणीचा भोकरदन शहरातील एका तरूणाशी काही दिवसांपूर्वी अंतरजातीय विवाह झाला होता. त्यानंतर त्याचा नवीन संसार सुरू असतानाच १३ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान सदारील विवाहितेने घराशेजारील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी सोबत नेत असल्याचे सांगून दोघी घराबाहेर पडल्या. त्या दोघीजणी रात्री उशिरापर्यंत घरी परत आल्याच नाही.
त्यामुळे या दोघींच्या नातेवाईकानी शोधाशोध सुरू केली. मात्र, १४ जुलै सकाळपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अखेर भोकरदन पोलिस ठाण्यात या दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे़ भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी या दोघींच्या शोधासाठी सहाय्यक पोलिस उपनिनिरीक्षक सुरेश डावकरे यांचे पथक रवाना झाले आहे. अधिक तपास भोकदन पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)