जिनिंग व्यवसाय कमालीचा संकटात

By Admin | Updated: November 30, 2014 00:55 IST2014-11-30T00:49:12+5:302014-11-30T00:55:01+5:30

गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे कापसाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट आली. त्याचबरोबर शासनाच्या काही धोरणामुळे जिनिंग व्यवसाय अडचणीत आला आहे.

The ginning business is in dire straits | जिनिंग व्यवसाय कमालीचा संकटात

जिनिंग व्यवसाय कमालीचा संकटात


गजेंद्र देशमुख , जालना
जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे कापसाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट आली. त्याचबरोबर शासनाच्या काही धोरणामुळे जिनिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५० पैकी ५ जिनिंग सुरु आहेत. यामुळे पर्यायी उद्योग मिळून चारशे ते पाचशे कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे या व्यवसायातील तज्ज्ञांनी सांगितले.
गत काही वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. शेतकरी आर्थिक संकटात रुतत आहे. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे कापसाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट आली आहे. जो कापूस आला तो व्यापारी अथवा सीसीआय केंद्रातून खरेदी होत आहे. त्यातच अत्यल्प कापूस असल्याने अनेक शेतकरी जिनिंग ऐवजी खाजगी व्यापाऱ्यास कापूस विक्री करुन मोकळे होत आहेत. याचा थेट फटका जिनिंग उद्योगाला बसत आहे.
खाजगी व्यापारी ३८०० रुपयांच्या दरम्यान तर सीसीआय ४०२५- ४०५० रुपये प्रति क्विंटलला भाव देत आहे. जिनिंगमध्ये कापूस नसल्याने अनेकांनी जिनिंंब बंद ठेवले आहेत. चार सहा महिन्यांत २० ते २५ लाख क्ंिवटल कापसाचे जिनिंंग होते.
जिनिंग व प्रेसिंग व्यवसाय साधारणपणे सहा ते सात महिने सुरु असतो त्यात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च दरम्यान मालाची आवक जास्त असते. यावर्षी अशी परिस्थिती नाही. सीसीआय मिळून फक्त ४० ते ५० हजार क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे.
जालना जिल्ह्यात मंठा -४, सातोना १, परतूर ५, वाटूर १, सेवली १, कुंभारपिंपळगाव २, तीर्थपुरी २, अंबड ४, भोकरदन ६, बदनापूर २, जालना १२ मिळून ५० जिनिंग आहेत. असे असले तरी यापैकी ५ जिनिंग सुरु आहेत.
सर्व जिनिंगचा विचार करता दिवसाकाठी २५ हजार क्विंटल कापसाचे जनिंग होते. दिवसाकाठी १२ ते १५ कोटींची उलाढाल होते. या वर्षी हे चित्र बदलले आहे. बोटावर मोजण्याइतक्याच जिनिंग व्यवस्थित सुरु आहेत.
पर्यायी उद्योगांना मोठा फटका
जिनिंगसोबतच आॅईलमिल, इतर उपउद्योग मिळून साधारणपणे ४०० ते ५०० कोटींचा फटका बसत आहे. कापसाच्या सरकीवर आॅईल मिल चालते. परंतु जिनिंगच बंद असल्याने आॅईल मिलवरही संकट ओढावले आहे.
एका जिनिंगमध्ये दीडशे ते दोनशे मजूर कामावर असतात. जिनिंग बंद असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. जिनिंग बंदचा फटका २ ते ३ हजार मजुरांना बसला आहे.
४जिनिंगमधून कापसाची खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम मिळते. वेळही वाचतो, असे असले तरी व्यापारी थेट गावात जाऊन कापसाची खरेदी करीत असल्याने शेतकरी जिनिंगवर येईनासे झाले आहेत. ४
जिनिंंग व्यवसायिक व उद्योजक राजेश नहार म्हणाले, वरुणराजाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कापसाचे उत्पादन तर कमी झालेच परंतु शासनाच्या अनेक विचित्र धोरणांमुळेही जिनिंंग व्यवसायावर मर्यादा येत आहेत. आयात तसेच निर्यात धोरणात अनेक त्रुटी आहेत. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Web Title: The ginning business is in dire straits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.