घंटागाड्यांचे वेळापत्रक ‘‘फिक्स’ नाही,

By Admin | Updated: February 2, 2015 01:14 IST2015-02-02T00:56:50+5:302015-02-02T01:14:03+5:30

बीड : आमच्या भागात घंटागाडीच येत नाही, आली तरी आम्हाला कळत नाही, अशा तक्रारी शहरवासीयांमधून येत होत्य, याची दखल घेत आता मुख्याधिकाऱ्यांनी घंटागाड्यांच्या वेळा

Ghumland schedule is not "fix" | घंटागाड्यांचे वेळापत्रक ‘‘फिक्स’ नाही,

घंटागाड्यांचे वेळापत्रक ‘‘फिक्स’ नाही,

घंटागाड्यांचे वेळापत्रक ‘‘फिक्स’ नाही, 

बीड : आमच्या भागात घंटागाडीच येत नाही, आली तरी आम्हाला कळत नाही, अशा तक्रारी शहरवासीयांमधून येत होत्य, याची दखल घेत आता मुख्याधिकाऱ्यांनी घंटागाड्यांच्या वेळा ‘फिक्स’ केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रभाग व त्याचे वेळापत्रक नेमून दिले असून हे वेळापत्रक नगरसेवकांनाही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘स्वच्छता आणि पाणी’ या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ‘लोकमत’ने नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या व परीचर्चाही घडवून आणली होती. याची दखल घेत मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी कामाला गती दिली. विविध नियमांची अमंलबजावणी करण्यासही सुरूवात केली.
नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्याचा निपटारा व्हावा, यासाठी भालसिंग यांनी मंगळवारी विविध विभागप्रमुखांना कार्यालयातच थांबण्याचे आदेश दिले आहेत. तसेच घंटागाडीबाबत नागरीकांच्या तक्रारी येवू नयेत यासाठी प्रत्येक गल्लीत घंटागाडी पोहचविण्यासाठी त्यांनी घंटागाड्यांना वेळा निश्चीत करून दिल्या आहेत. यामुळे आता कचराही राहणार नाही, आणि नागरीकांच्या तक्रारीही येणार नाहीत, असा विश्वास मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी व्यक्त केला. घंटागाडी खरंच येते की नाही, हे पाहण्यासाठी नगरसेवकांनीही लोकप्रतिनिधी म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. घंटागाड्यांच्या वेळापत्रकाची आणि नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचा संपर्क असलेले पत्र नगरसेवकांना बुधवारी दिले असल्याचे स्वच्छता निरीक्षक व्ही.टी.तिडके म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Ghumland schedule is not "fix"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.