गुट्टे यांची खर्चात सरशी

By Admin | Updated: October 7, 2014 00:14 IST2014-10-07T00:09:22+5:302014-10-07T00:14:51+5:30

उद्धव चाटे, गंगाखेड गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील १९ उमेदवारांच्या झालेल्या खर्चाचा पहिला टप्पा प्रशासनाने मागविला असून यात १५ उमेदवारांनी निवडणूक खर्च दाखल केला.

Ghetto's costume, Sarashi | गुट्टे यांची खर्चात सरशी

गुट्टे यांची खर्चात सरशी

उद्धव चाटे, गंगाखेड
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील १९ उमेदवारांच्या झालेल्या खर्चाचा पहिला टप्पा प्रशासनाने मागविला असून यात १५ उमेदवारांनी निवडणूक खर्च दाखल केला. यामध्ये रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी खर्चात आघाडी घेतली असून त्यांच्या नावे ३ लाख ७१ हजार ६०५ रुपयांची नोंद आहे.
या विधानसभा मतदारसंघात उभ्या असलेल्या १९ उमेदवारांपैकी १५ उमेदवारांनी खर्च सादर केले आहेत. तर चार उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील खर्च सादर केला नसल्याने त्यांना निवडणूक विभागाच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या खालोखाल खर्चात अपक्ष उमेदवार श्रीकांत भोसले यांची नोंद असून त्यांनी २ लाख १२ हजार ५२० रुपये खर्च केला आहे. अपक्ष उमेदवार आ.सीताराम घनदाट यांनी १ लाख १२ हजार ७८९ रुपये, शिवसेना उमेदवार शिवाजी दळणर यांनी ७७ हजार ५०० रुपये, राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे यांनी ६४ हजार ६९२ रुपये, काँग्रेसचे रविकांत चौधरी यांनी ६० हजार ९५० रुपये, मनसेचे बालाजी देसाई यांनी ३२ हजार १९३ रुपये, मजलिस बचावो तहेरीकचे जाफर अहेमद खान यांनी १६ हजार ८१४ रुपये, अपक्ष शेख युनूस यांनी १५ हजार ३८५ रुपये, अपक्ष श्यामसुंदर मुंडे यांनी १४ हजार ७५ रुपये, अपक्ष शेख सादेक यांनी १३ हजार ५५ रुपये, शेकापच्या चित्राताई दुधाटे यांनी १० हजार ८१० रुपये, भारिपचे यशवंत भालेराव यांनी ६ हजार ८८० रुपये तर बीएसपीचे शिवराज पैठणे यांनी ५ हजार ४८० रुपये खर्च केला असल्याची नोंद निवडणूक विभागाकडे करण्यात आली आहे.

Web Title: Ghetto's costume, Sarashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.