घारेगाव, एकतुनी शिवारात वादळी वाऱ्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:04 IST2021-04-28T04:04:32+5:302021-04-28T04:04:32+5:30

घारेगाव, एकतुनी शिवारात सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यामुळे कच्च्या पक्या विटात बांधकाम केलेल्या घरांवरील पत्रे उडाल्याने ग्रामस्थांची ...

Gharegaon, Ektuni Shivara in the gusts of wind | घारेगाव, एकतुनी शिवारात वादळी वाऱ्याचा धुमाकूळ

घारेगाव, एकतुनी शिवारात वादळी वाऱ्याचा धुमाकूळ

घारेगाव, एकतुनी शिवारात सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यामुळे कच्च्या पक्या विटात बांधकाम केलेल्या घरांवरील पत्रे उडाल्याने ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली होती. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. पाऊस पडला नसून फक्त जोरदार वाऱ्याने मोठे नुकसान झाले. बाबूराव वाघमारे, कचरू वाघमारे, विलास वाघमारे, सदानंद वाघमारे, लीलाबाई वाघमारे, संदीपान वाघमारे, साहेबराव वाघमारे, रामेश्वर वाघमारे, प्रभुदास वाघमारे, दयानंद वाघमारे यांच्या घरावरील पत्रे उडून बऱ्याच अंतरावर जाऊन पडली. तसेच झाडांच्या फांद्यांही तुटून पडल्या. दयानंद वाघमारे यांना घरावरील दगडाचा मार लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य अभिलेश वाघमारे, सेवक वाघमारे यांनी तात्काळ नागरिकांना सुखरूप ठिकाणी हलविण्यासाठी मदतकार्य केले. घारेगाव परिसरात विजेच्या खांबावरील तारा ठिकठिकाणी तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

फोटो : घारेगाव, एकतुनी परिसरात घरावरील पत्रे उडून गेल्याने उघड्यावर पडलेला संसार.

270421\ankush bisanrao wagh_img-20210427-wa0079_1.jpg

घारेगाव एकतुनी परिसरात घरावरील पत्रे उडून  गेल्याने उघड्यावर पडलेला संसार.

Web Title: Gharegaon, Ektuni Shivara in the gusts of wind