बदली होऊनही वर्षानुवर्षे ‘घरोबा’ !
By Admin | Updated: December 9, 2015 23:54 IST2015-12-09T23:44:18+5:302015-12-09T23:54:07+5:30
हणमंत गायकवाड , लातूर शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या दोन्हीही वसाहतीत बदली होऊन गेलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या ९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अनधिकृत वास्तव्य आहे.

बदली होऊनही वर्षानुवर्षे ‘घरोबा’ !
हणमंत गायकवाड , लातूर
शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या दोन्हीही वसाहतीत बदली होऊन गेलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या ९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अनधिकृत वास्तव्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून या निवासस्थानात वर्षानुवर्षे त्यांचा ‘घरोबा’ कायम आहे. पाच, दहा, पंधरा, सतरा, वीस वर्षांपासून या घरांवर त्यांचाच ताबा आहे. त्यांना या घरातून बाहेर काढणे मुश्किलीचे आहे. शिवाय, काही मयत कर्मचाऱ्यांच्याही नावावर घरांचा ताबा आहे.
बार्शी रोडवर ४३० आणि औसा रोडवरील संक्रमण वसाहतीत ५७ असे एकूण ४८७ शासकीय घरं आहेत. या घरांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ताबा देण्यात येतो. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी नसताना ९८ घरांमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी तसेच बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे. ज्याच्या नावावर घराचा ताबा आहे, अशा काही कर्मचाऱ्यांचे निधनही झाले आहे. परंतु, त्या मयत कर्मचाऱ्याच्या नावे दुसऱ्याचेच वास्तव्य आहे. हा प्रकार पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सा.बां.च्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस पाठविली असून, अनधिकृत वास्तव्यास असलेल्या ९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, घर वाटप समितीच्या बैठकीत प्रत्यक्ष सूचनाही दिल्या आहेत. परंतु, सा.बां.ने अनधिकृत वास्तव्याबाबत अद्याप कारवाई केलेली नाही. (अधिक वृत्त हॅलो/२ वर)
तपासणी पथकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अनधिकृत वास्तव्यास असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी सुपूर्द केली आहे. त्या यादीमध्ये नायब तहसीलदार एस.एस. टिपरसे (लातूर), नायब तहसीलदार पी.एन. कोठुळे (रेणापूर), शाखा अभियंता सुरेखा विश्वनाथ उचाटे (विद्युत निरीक्षक कार्यालय, उस्मानाबाद), लिपीक प्रेम तात्याराव हाळणे (सा.बां. उपविभाग, लातूर), लिपीक विजय रघुनाथ कुलकर्णी (सा.बां. उपविभाग, निलंगा), अव्वल कारकुन गणेश दत्तात्रय सरवदे (जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर), लिपीक लक्ष्मण गोविंदराव सूर्यवंशी (सा.बां. वि.क्र. १ लातूर, सेवानिवृत्त), रोड कारकून मुकुंद शेषेराव जोशी (सा.बां. उ.वि.क्र. २ लातूर), अव्वल कारकून टी.पी. मुंडे (चाकूर तहसील कार्यालय), अधिव्याख्याता नितीन आगवाने (महिला तंत्रनिकेतन नंदूरबार), लिपीक पंढरीनाथ दामोदर शेळके (दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर लातूर), लिपीक मुकुंद रंगनाथ जोशी (जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर), लिपीक रफिक हन्नुमियाँ शेख (स्वामी रामानंद तीर्थ उपकेंद्र, पेठ), लिपीक वसंत पिराजी हत्तरगे (दिवाणी न्यायालय, निलंगा) पोलिस शिपाई मंगल भीमराव घुले (पोलिस अधीक्षक कार्यालय, लातूर, २/१० निवासस्थानाचा अनधिकृत ताबा), अव्वल कारकून रत्नाकर मुरलीधर महामुनी (शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालय), शिपाई बालाजी दिगंबर फड (समाजकल्याण कार्यालय, लातूर), शिपाई मणकर्णा ज्ञानदेव घोगरे (सा.बां. लातूर), लिपीक अंजली मधुकर दंडे (पोलिस कार्यालय, लातूर), शिपाई महानंदा देविदास पल्लेवाड (सा.बां.वि. १ लातूर), लिपीक हणमंत श्रीमंत मुदामे (तहसील कार्यालय, लातूर), विमल संभाजी पचरंडे (सामाजिक वनीकरण, लातूर), शिपाई सुग्रीव बाबुराव कदम (कार्यकारी अभियंता सा.बां.उ.वि. लातूर), वरिष्ठ लिपीक अश्विनी दत्तात्रय जाधव (दुय्यम निबंधक कार्यालय, औसा), अर्जुन नाना शिंदे (एनएसीसी कार्यालय, लातूर), लिपीक दिलीप नारायण वलसे (मार्ग प्रकल्प सा.बां. लातूर, सेवानिवृत्त) हे २७ अधिकारी-कर्मचारी औसा रोडवरील संक्रमण निवासस्थानात आहेत.
तपासणी पथकाने केलेल्या पाहणीमध्ये ९८ कर्मचारी अनधिकृत जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविना राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. कारवाईचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचेही सुचित केले असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले.