शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

'घनश्याम सुंदरा... केक कापले सतरा'; ठाणेदार घनश्याम सोनवणे यांच्या वाढदिवसाचा सोहळा व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 16:03 IST

PI Ghanshyam Sonawane's birthday party goes viral या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व हे प्रेम पाहून ‘घनश्याम सुंदरा... केक कापले सतरा...’ अशी कवणं नागरिकांच्या ओठावर नाचू लागली.

ठळक मुद्देत्यांच्या संपूर्ण नावात १७ इंग्रजी अल्फाबेट (अक्षर) आहेत.त्यावरून त्यांच्या समर्थकांनी १७ केक आणले.

- बापू सोळुंके

औरंगाबाद : क्रेझ काय? फक्त राजकीय नेते, सेलिब्रिटी यांचीच असते काय? शहर पोलीस दलातील कम्युनिटी पोलिसिंगमध्ये ‘पटाईत’ ठरलेले पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचा जलवा गेल्या २४ तासात शहरवासीयांना पाहायला मिळाला. सोनवणे यांच्या रविवारी साजऱ्या झालेल्या वाढदिवसानिमित्त चाहते, समर्थकांनी तब्बल १७ केक कापून एक विक्रमच नोंदवला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व हे प्रेम पाहून ‘घनश्याम सुंदरा... केक कापले सतरा...’ अशी कवणं नागरिकांच्या ओठावर नाचू लागली.

शहरात अद्याप कुणाच्याही वाढदिवसाला १७ केक कापल्याची तशी नोंद नाही. अर्थात हा आकडा सतराच का? सोनवणे यांचा हा वाढदिवस सतरावा नक्कीच नाही. मग कसे? समर्थक आपल्या नेत्यांची पेढे, जिलेबी तुला करतांना आपण पाहिले असेल. त्याच पद्धतीने सोनवणे यांच्या संपूर्ण नावाचीही तुलाच समजा. त्यांच्या संपूर्ण नावात १७ इंग्रजी अल्फाबेट (अक्षर) आहेत. त्यावरून त्यांच्या समर्थकांनाही ही आयडियाची कल्पना सुचली व त्याने १७ केक आणले. गारखेडा परिसरातील गजानन कॉलनीमध्ये एका गॅरेजमध्ये या केक कटींगचा स्नेहमयी सोहळा पार पडला. प्रेमात अडसर आणणारा कोरोना कोण? त्यांच्या चाहत्यांनी कोरोनाला अक्षरश पायदळी तुडविले. आता कोरोना निर्बंध उठले आहेत. अनेक दिवसापासून मास्क आड लपवलेले चेहरे यानिमित्त मोकळे होऊन या सोहळ्याचे सुंदर शूटिंगही करण्यात आले. शुभेच्छाही देवाण घेवाण झाली. हे फोटोसेशन व्हायरल झाले व लोक , घनश्याम सुंदरा.... म्हणू लागले.

केक अनाथालयास पाठविलेमाझ्या जन्मदिनानिमित्ताने केक कापण्यासाठी मला वारंवार फोन करून बोलावण्यात आल्याने मी तेथे गेलो. तेथे टेबलवर ठेवलेल्या १७ केकपैकी मी एक केक कापला. यानंतर हे केक पारिजातनगर येथील अनाथआश्रमातील बालकांना पाठविण्याचे संयोजकांना मी सांगितले.-घनश्याम सोनवणे, सपोनि, पुंडलिकनगर ठाणे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद