शौचालयाचे अनुदान मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:32 IST2017-08-24T00:32:51+5:302017-08-24T00:32:51+5:30

जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी एकीकडे प्रशासन जोरदार प्रयत्न करीत असताना दुसरीकडे लाभार्थ्यांना १२ हजारांचे अनुदान वाटप करण्यासाठी निधी नसल्याने या मोहिमेला खीळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. साडेचार हजार शौचालयांना अजूनही अनुदान मिळाले नाही.

 Get toilet subsidy | शौचालयाचे अनुदान मिळेना

शौचालयाचे अनुदान मिळेना

हिंगोली : जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी एकीकडे प्रशासन जोरदार प्रयत्न करीत असताना दुसरीकडे लाभार्थ्यांना १२ हजारांचे अनुदान वाटप करण्यासाठी निधी नसल्याने या मोहिमेला खीळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. साडेचार हजार शौचालयांना अजूनही अनुदान मिळाले नाही.
हिंगोली जिल्ह्यात जवळपास ९0 शौचालयांच्या बांधकामांचे उद्दिष्ट आहे. यात औंढा नागनाथ १३५५५, वसमत-१९५८८, हिंगोली-१४७७१, कळमनुरी-२१४९८ तर सेनगाव-२११0५ असे उद्दिष्ट आहे. औंढा, वसमत व हिंगोली हे तीन तालुके मेअखेर हागणदारीमुक्त करायचे होते. मात्र झाले नाही. आता सेनगाव व कळमनुरी आॅगस्टअखेर हागणदारीमुक्त करायचे आहेत. मात्र सगळीकडेच ही मोहीम वेगवान झाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीमार्फत मिळालेला सात कोटींचा निधी अनुदान वाटपात संपला आहे. आता नव्याने होणाºया वाटपासाठी निधीच शिल्लक नाही. केंद्र शासनाकडून येणाºया निधीची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. परंतु या मोहिमेत कुठे गुन्हे दाखल करण्याची तर कुठे प्रमाणपत्र, धान्य न देण्याची दवंडी पिटल्याने शौचालय बांधकामांना गती आली होती. यात ७ कोटींची रक्कम संपली आहे. जवळपास २१ हजार ८१७ शौचालयांची कामे पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर यापैकी ४४00 शौचालयांचे अनुदान वाटप करणे बाकी आहे. त्यामुळे प्रतिलाभार्थी १२ हजारांप्रमाणे त्यांचे अनुदान रखडलेले आहे. तर येत्या आठवड्यात ७ हजार शौचालयांची कामे पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे जवळपास १३ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तूर्त प्रशासनाकडे छदामही नाही.

Web Title:  Get toilet subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.