विधानसभेसाठी सज्ज व्हा- राजीव सातव
By Admin | Updated: September 7, 2014 00:28 IST2014-09-07T00:26:26+5:302014-09-07T00:28:01+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन खा. राजीव सातव यांनी केले.

विधानसभेसाठी सज्ज व्हा- राजीव सातव
कळमनुरी : विकासकामाच्या जोरावर जनतेने लोकसभा निवडणुकीत जो विश्वास दाखवला तोच कायम राखत आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन खा. राजीव सातव यांनी केले.
कळमनुरी विधानसभेतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, तालुकाध्यक्ष सदाशिव जटाळे, डॉ. संतोष टारफे, अॅड. बाबा नाईक, दिलीप देसाई, केशवराव चव्हाण, अजित मगर, औंढा तालुकाध्यक्ष माणिकराव पाटील, नगराध्यक्षा यास्मीन बेगम, प्रा. आनंद पारडकर, धनंजय पाटील, केशव मस्के, नंदु तोष्णीवाल, दत्ता लोंढे, दिगंबर कदम, हाफीज फारूखी, अरूण वाढवे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा. सातव यांनी कळमनुरी विधानसभेत मागील पाच वर्षांत उभारण्यात आलेल्या विकासकामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. विधानसभेचेही लोकसभेप्रमाणेच बुथनिहाय नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (वार्ताहर)