वैद्यकीय अधिकारी मिळेना
By Admin | Updated: August 19, 2014 02:13 IST2014-08-19T01:38:31+5:302014-08-19T02:13:41+5:30
दैठणा : परभणी तालुक्यातील गंगाखेड रस्त्यावरील दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे़ त्यामुळे

वैद्यकीय अधिकारी मिळेना
दैठणा : परभणी तालुक्यातील गंगाखेड रस्त्यावरील दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे़ त्यामुळे दैठणा व परिसरातील हजारो रुग्णांची गैरसोय होत आहे़ त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़
परभणी तालुक्यातील दैठणा हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आहे़ या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे़ या आरोग्य केंद्रात दैठणा व परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात़ परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने अधिकारी व परिचारिकांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही़ या रुग्णालयात दोन परिचारिकांची पदे मंजूर असून, त्यापैकी एक जण रजेवर गेल्याने एकाच परिचारिकेवर रुग्णालयाचा कारभार सुरू आहे़ त्यामुळे दैठणा व परिसरातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची हेळसांड होत आहे़ रुग्णांना उपचारासाठी परभणी येथे यावे लागत असल्याने आर्थिक भुर्र्दंड बसत आहे़
त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी रुग्णांमधून केली जात आहे़ (वार्ताहर)