शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गुरु मिळणे भाग्याचे

By admin | Updated: July 12, 2014 00:59 IST

नम्रता आणि प्रेम या गोष्टी त्यांच्या नसानसांत भिनलेल्या आहेत. तसेच आपल्यापेक्षा लहान किंवा कमजोर व्यक्तीलासुद्धा सदैव क्षमा आणि सद्भाव या गोष्टींनी आधार देतात.

पार्वती दत्ता, कथ्थकसम्राट पंडित बिरजू महाराज यांच्याकडे नृत्य शिक्षण घेणे ही कोणत्याही नृत्याभिलाषीसाठी एक स्वप्न रंगवण्यासारखे आहे. माझ्यासाठी ही तर अविस्मरणीय गोष्ट आहे. जसे की, त्यांच्या दिव्य नृत्य कलेने माझ्या मनात नृत्य शिक्षण्याची एक नवी प्रेरणा व नृत्यकार बनायची उमीद जागवली. मी ३ वर्षांची होते तेव्हा मी महाराजांचे कथ्थक नृत्य पहिल्यांदा पाहिले. त्या वयातील ही घटना मला अजूनही स्पष्ट दिसते. त्यांचे व्यक्तित्व, ज्ञान आणि कला या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर इतका पडला की, शालेय जीवनातच नृत्यकार बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षण पूर्ण करीत होते. एक दिवस मी त्यांचा आशीर्वाद घेऊन व नृत्यांचे प्रशिक्षण त्यांच्याकडूनच घेईन, असे मनात निश्चित करून नृत्यांची तालीम करीत गेले. सुदैवाने माझी ही इच्छा पूर्णही झाली. जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आपले घर आणि परिवार यांना सोडून दूर दिल्लीला गेले होते. त्यावेळी मी गुरू-शिष्य परंपरेनुसार पं. बिरजू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यांची तालीम सुरू केली. या दिवसांत महाराजांकडून नृत्यांच्या बंदिश, बारकाई, परंपरेचे मर्म आणि इतिहास तर शिकलाच त्याचसोबत महत्त्वाचे म्हणजे धर्म, संयम आणि आत्मविश्वास, क्षमा आणि सहिष्णुता कशी आत्मसात करायची हेही मला गुरूजींकडून शिकायला मिळाले. १९९६ मध्ये मी महागामीमध्ये संचालन आणि नृत्य शिक्षण सुरू केले. या १८ वर्षांच्या कालावधीत त्यांनी कित्येकदा या ठिकाणी येऊन माझ्या कार्याचे कौतुक केले. अशा महान गुरूंना मी सदैव नमस्कार करते. आशा करते की त्यांच्या या महान कला आणि जीवनदर्शनाला मी सर्वदूर मझ्या कलेद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न करील.