गुरु मिळणे भाग्याचे
By Admin | Updated: July 12, 2014 00:59 IST2014-07-12T00:59:42+5:302014-07-12T00:59:42+5:30
नम्रता आणि प्रेम या गोष्टी त्यांच्या नसानसांत भिनलेल्या आहेत. तसेच आपल्यापेक्षा लहान किंवा कमजोर व्यक्तीलासुद्धा सदैव क्षमा आणि सद्भाव या गोष्टींनी आधार देतात.

गुरु मिळणे भाग्याचे
पार्वती दत्ता,
कथ्थकसम्राट पंडित बिरजू महाराज यांच्याकडे नृत्य शिक्षण घेणे ही कोणत्याही नृत्याभिलाषीसाठी एक स्वप्न रंगवण्यासारखे आहे. माझ्यासाठी ही तर अविस्मरणीय गोष्ट आहे. जसे की, त्यांच्या दिव्य नृत्य कलेने माझ्या मनात नृत्य शिक्षण्याची एक नवी प्रेरणा व नृत्यकार बनायची उमीद जागवली. मी ३ वर्षांची होते तेव्हा मी महाराजांचे कथ्थक नृत्य पहिल्यांदा पाहिले. त्या वयातील ही घटना मला अजूनही स्पष्ट दिसते. त्यांचे व्यक्तित्व, ज्ञान आणि कला या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर इतका पडला की, शालेय जीवनातच नृत्यकार बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षण पूर्ण करीत होते. एक दिवस मी त्यांचा आशीर्वाद घेऊन व नृत्यांचे प्रशिक्षण त्यांच्याकडूनच घेईन, असे मनात निश्चित करून नृत्यांची तालीम करीत गेले. सुदैवाने माझी ही इच्छा पूर्णही झाली.
जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आपले घर आणि परिवार यांना सोडून दूर दिल्लीला गेले होते. त्यावेळी मी गुरू-शिष्य परंपरेनुसार पं. बिरजू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यांची तालीम सुरू केली. या दिवसांत महाराजांकडून नृत्यांच्या बंदिश, बारकाई, परंपरेचे मर्म आणि इतिहास तर शिकलाच त्याचसोबत महत्त्वाचे म्हणजे धर्म, संयम आणि आत्मविश्वास, क्षमा आणि सहिष्णुता कशी आत्मसात करायची हेही मला गुरूजींकडून शिकायला मिळाले. १९९६ मध्ये मी महागामीमध्ये संचालन आणि नृत्य शिक्षण सुरू केले. या १८ वर्षांच्या कालावधीत त्यांनी कित्येकदा या ठिकाणी येऊन माझ्या कार्याचे कौतुक केले. अशा महान गुरूंना मी सदैव नमस्कार करते. आशा करते की त्यांच्या या महान कला आणि जीवनदर्शनाला मी सर्वदूर मझ्या कलेद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न करील.