शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

स्वप्नातील घर मिळणार ! चिकलठाण्यात म्हाडाचा अल्पउत्पन्न गटासाठी ४०० घरांचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 4:37 PM

MHADA Homes in Auranagabad : म्हाडाकडून घर घेताना कोणतेही छुपे खर्च नसल्याने म्हाडाचा शहरात गृहप्रकल्प आहे, का याविषयी सतत विचारणा होत असते.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) चिकलठाणा येथील विमानतळासमोर ४०० घरांचा भव्य प्रकल्प (MHADA Homes in Auranagabad ) बांधणार आहे. अल्पउत्पन्न गटासाठी असलेल्या या गृहप्रकल्पासाठी डिसेंबर महिन्यात पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

औरंगाबादेत घर आणि भूखंडांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पोटाला चिमटा देऊन आणि कर्ज काढून घेतलेले स्वस्त घर हे निर्विवाद, अधिकृत असेलच याची खात्री नसते. घरे किंवा प्लॉट घेतलेल्या अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. या बिल्डरांना जेलमध्येही जावे लागले आहे. याउलट ‘म्हाडा’कडून खरेदी केलेले घर निर्विवाद असते. त्यामुळे सामान्य नागरिकांचा म्हाडाचे घर घेण्याकडेच कल असतो. १ नोव्हेंबर रोजी म्हाडाने सोडत पद्धतीने शहरातील १३५ नागरिकांना देवळाई, पडेगाव आणि भावसिंगपुरा येथे घरे मिळवून दिली होती. शासनाच्या नियमानुसार बिल्डरांनी ही घरे म्हाडाच्या ग्राहकांसाठी उपलब्ध केली होती. 

म्हाडाकडून घर घेताना कोणतेही छुपे खर्च नसल्याने म्हाडाचा शहरात गृहप्रकल्प आहे, का याविषयी सतत विचारणा होत असते. ही बाब लक्षात घेऊन म्हाडा आता चिकलठाणा येथे सुमारे ४०० फ्लॅटचा गृहप्रकल्प उभारत असल्याची माहिती समोर आली. बहुमजली इमारतीत (अपार्टमेंट) या सदनिका असतील. २५ हजार ते ५० हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी ही घरे असतील. या गृहप्रकल्पाचा अंतिम आराखडा मान्यतेसाठी बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा आराखडा मंजूर होताच पुढील महिन्यात यासाठी जाहिरात प्रकाशित होईल. या जाहिरातीनुसार घर घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत.

प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी पाठवलाम्हाडाची घरे निर्विवाद असतात. यामुळे सामान्यांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करण्यासाठी म्हाडा सतत प्रयत्नशील आहे. येथे मिळालेल्या जमिनीवर म्हाडा ४००हून अधिक सदनिकांचा गृहप्रकल्प उभारणार आहे. एलआयजी (अल्पउत्पन्न गट) ग्राहकांसाठी हा प्रकल्प आहे. याबाबतचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला. बांधकाम विभागाकडून ही फाइल आल्यावर डिसेंबर महिन्यात यासंदर्भात जाहिरात प्रकाशित होईल.- अण्णासाहेब शिंदे, मुख्याधिकारी, म्हाडा, औरंगाबाद 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmhadaम्हाडा