छेड काढणाऱ्या तरुणाच्या तावडीतून जर्मन तरुणीची सुटका

By Admin | Updated: July 3, 2016 00:44 IST2016-07-03T00:34:37+5:302016-07-03T00:44:16+5:30

औरंगाबाद : समाजसेवा करण्यासाठी दहा महिन्यांपासून पेइंग गेस्ट म्हणून शहरात राहणाऱ्या एका जर्मन तरुणीची रोडरोमिओने छेड काढल्याने खळबळ उडाली आहे.

The German girl rescued from the clutches of the victim | छेड काढणाऱ्या तरुणाच्या तावडीतून जर्मन तरुणीची सुटका

छेड काढणाऱ्या तरुणाच्या तावडीतून जर्मन तरुणीची सुटका

औरंगाबाद : समाजसेवा करण्यासाठी दहा महिन्यांपासून पेइंग गेस्ट म्हणून शहरात राहणाऱ्या एका जर्मन तरुणीची रोडरोमिओने छेड काढल्याने खळबळ उडाली आहे. याप्रसंगी सजग नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या तरुणीची छेड काढणाऱ्यास अटक करून तिची सुटका केली. ही घटना शनिवारी दुपारी सिडको एन-२ मधील मायानगर येथे घडली.
नागेश बोर्डे (२५, रा. अकोला) असे आरोपीचे नाव आहे. त्याने काही दिवस प्रोझोन मॉल येथे काम केले होते. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, जर्मन देशातील रहिवासी असलेली तरुणी समाजसेवा करण्याच्या उद्देशाने दहा महिन्यांपूर्वी औरंगाबादेत आलेली आहे. तेव्हापासून ती सिडको एन-२ परिसरातील मायानगर येथे पेइंग गेस्ट म्हणून राहते आणि शहरातील एका समाजसेवा केंद्रात समाजसेवक म्हणून ती काम करते.
शनिवारी दुपारी प्रोझोन मॉल येथे शॉपिंग करून ती मायानगरकडे पायी जात होती. त्यावेळी प्रोझोन मॉलपासून आरोपी नागेश हा तिचा पाठलाग करीत असल्याचे समजले. मात्र तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. एपीआय कॉर्नर ओलांडून ती मायानगरकडे वळत असतानाच आरोपीने शुक शुक करीत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो थेट तिला आडवा झाला आणि मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणू लागला. यावेळी तिने बोलण्यास नकार दिला, मात्र त्यानंतरही तो तिचा रस्ता सोडत नव्हता.

Web Title: The German girl rescued from the clutches of the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.