जालना शहरात बंदी असलेल्या औषधींची सर्रास विक्री...!
By Admin | Updated: November 3, 2016 01:45 IST2016-11-03T01:42:34+5:302016-11-03T01:45:20+5:30
जालना :शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात बंदी असलेल्या गर्भपातासाठी असलेली औषधी आढळून आली होती.

जालना शहरात बंदी असलेल्या औषधींची सर्रास विक्री...!
जालना : शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात बंदी असलेल्या गर्भपातासाठी असलेली औषधी आढळून आली होती. त्यानंतर आता पुन्हा या औषधींची विक्री सुरू झाली आहे.
राज्यात गर्भपात तसेच इतर काही गोळ्या तसेच औषधींना बंदी आहे. मात्र काही ठिकाणी बाहेर राज्यातील उत्पादित औषधींची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे चित्र आहे. यामुळे पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी अवैध गर्भपात प्रकरणाचा तपास अद्यापही थंडबस्त्यात अडकला आहे.
अशा प्रकारच्या औषधींची विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानांवरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिला होता. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. जालनानंतर घनसावंगीही गर्भपात करणारी औषधी आढळून आली होती. त्यानुषंगानेही तपास सुरू आहे. मात्र यावर ठोस कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यातून काही औषधी छुप्या मार्गाने शहरात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अशा औषधींना राज्यात बंदी आहे. गर्भपात करणाऱ्या औषधींची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी सांगितले की, अन्न व औषधी प्रशासनाने कारवाई करावी. त्यांनी जर तपासणी केली तर आम्ही पुढील कारवाई करू. (प्रतिनिधी)