आमदाराच्या ‘भाऊ’गिरीची गृहविभागाकडून चौकशी

By Admin | Updated: September 4, 2016 01:04 IST2016-09-04T00:59:15+5:302016-09-04T01:04:46+5:30

औरंगाबाद : बदनापूर ठाण्याचे निरीक्षक विद्यानंद काळे यांच्यावर भाजपच्या एका आमदाराने अनधिकृत कामे करण्यासाठी दबाव टाकून दादागिरी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला

General inquiries from MLA's 'brother-in-law' | आमदाराच्या ‘भाऊ’गिरीची गृहविभागाकडून चौकशी

आमदाराच्या ‘भाऊ’गिरीची गृहविभागाकडून चौकशी

औरंगाबाद : बदनापूर ठाण्याचे निरीक्षक विद्यानंद काळे यांच्यावर भाजपच्या एका आमदाराने अनधिकृत कामे करण्यासाठी दबाव टाकून दादागिरी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. आमदाराच्या या दादागिरी प्रकरणाची चौकशी करून नंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांनी शनिवारी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या प्र्रकरणाची चौकशी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, गैरकामासाठी पोलीस अधिकाऱ्याला अशा प्रकारे दबाव टाकून धमकाविणाऱ्या सत्ताधारी आमदारावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
विद्यानंद काळे हे बदनापूर ठाण्यात कार्यरत आहेत. कार्यकर्त्यांची विविध गैरकायदेशीर कामे करून देण्यासाठी एक भाजप आमदार काळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दबाव टाकत होते. काळे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु दिवसेंदिवस आमदाराचा त्रास वाढतच गेला. काल तर या आमदार महोदयांनी काळे यांना चक्क अश्लील शिवीगाळ करून अरेरावी करून दमदाटी केली. 

Web Title: General inquiries from MLA's 'brother-in-law'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.