गहिलोत दाम्पत्याचे संचालकपद केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:47 IST2017-09-16T23:47:02+5:302017-09-16T23:47:02+5:30

येथील नागनाथ अर्बन को-आॅप बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा झाली. सभेत बँकेचे संचालक शंभुसिंह गहिलोत यांच्या विरोधात अनेकांनी अक्षेपार्ह आरोप केल्याने सभा वादळी ठरली. गहिलोत दाम्पत्याचे सभासदत्व कायमचे रद्द करण्याचा ठराव झाला.

Gehlot Dakthi's Director has been canceled | गहिलोत दाम्पत्याचे संचालकपद केले रद्द

गहिलोत दाम्पत्याचे संचालकपद केले रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील नागनाथ अर्बन को-आॅप बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा झाली. सभेत बँकेचे संचालक शंभुसिंह गहिलोत यांच्या विरोधात अनेकांनी अक्षेपार्ह आरोप केल्याने सभा वादळी ठरली. गहिलोत दाम्पत्याचे सभासदत्व कायमचे रद्द करण्याचा ठराव झाला.
रामाकृष्णा लॉज येथे शनिवारी सभेत ३१ मार्च २०१७ अखेरच्या लेखा परिक्षणातील ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मान्यता दिली. कामकाजाच्या विषय पत्रिकेवर एकूण १२ विषय होते. त्यामध्ये विषय क्र. ९ वरील चर्चा चांगलीच गाजली. संचालक व सभासदांनी शंभूसिंह गहिलोत यांच्याविरुध्द असलेल्या तक्रारींचा पाढा वाचला. गहिलोत वारंवार बँकेसंदर्भात लेखी तक्रारी करतात. आत्तापर्यंत त्यांनी ६० च्यावर तक्रार अर्ज केल. बँकेच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचविण्याचे काम सातत्याने करीत असल्याने या बँकेची प्रतिमा त्यांच्या तोंडून मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. बँक कधीच तोट्यात नसताना ते सतत तोट्यात असल्याच्या लेखी व तोंडी तक्रारी करतात. त्यामुळे शंभुसिंह गहिलोत व मंगला गहिलोत यांचे कायमस्वरुपी पद रद्द करण्याची मागणी सभासदांनी लावून धरली. या तीव्र भावनांची दखल घेत सभेचे अध्यक्ष देशमुख यांनी त्यांचे प्राथमिक सभासदत्व रद्द करण्याचा प्रस्ताव मतदानासाठी ठेवला असता हा प्रस्ताव एकमताने पारित केला. सभेत झालेल्या चर्चेत बँकेचे उपाध्यक्ष सिंधुताई सरनाईक, संचालक बाळासाहेब आरळकर, दिलीप चव्हाण, अ‍ॅड. महेश बियाणी, बापूराव बांगर, मनोज आखरे, विनोद बोंढारे, खंडेराव सरनाईक, कवटे हजर होते.
अपील करणार-गहिलोत
याबाबत शंभूसिंह गहिलोत यांनी सहकारमंत्री तसेच सहकार आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. बँकेचे पाच हजार सभासद असताना केवळ दोनशे ते पाचशे लोकांना बोलावले होते. त्यातले अनेक तर संचालकच नव्हते. त्याचे चित्रिकरणही झाले आहे. त्याद्वारे मी माझी बाजू मांडून संचालकपदासाठी पुन्हा दावा करणार असल्याचेही गहिलोत यांनी सांगितले.

Web Title: Gehlot Dakthi's Director has been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.