मुखेडच्या नगराध्यक्षपदी गेडेवाड, उपनगराध्यक्षपदी शहजंहा बेगम यांची निवड
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:40:02+5:302014-08-17T00:54:10+5:30
मुखेड : मुखेड नगराध्यक्षपदी लोकभारतीच्या कालिंदी गेडेवाड तर उपनगराध्यक्षपदी शिवनसेनेच्या शहजंहा बेगम पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मुखेडच्या नगराध्यक्षपदी गेडेवाड, उपनगराध्यक्षपदी शहजंहा बेगम यांची निवड
मुखेड : मुखेड नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. नगराध्यक्षपदी लोकभारतीच्या कालिंदी गेडेवाड तर उपनगराध्यक्षपदी शिवनसेनेच्या शहजंहा बेगम पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी १७ पैकी १५ नगरसेवक उपस्थित होते. यावेळी लोकभारतीचे नगरसेवक बाबू सावकार देबडवार हे गैरहजर होते. निवडणूक अधिकारी उप जिल्हाधिकारी प्रशांत शेळके, तहसीलदार एस. पी. घोळके मुख्याधिकारी संतोष बोथीकर उपस्थित होते. (वार्ताहर)