गजानननगरात वीज,रस्त्याची बोंब
By Admin | Updated: September 11, 2014 01:10 IST2014-09-11T00:49:00+5:302014-09-11T01:10:21+5:30
औरंगाबाद : गजानननगरातील गल्ली नं. ४ व ५ मध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा योग्य क्षमतेच्या नसल्याने व त्या सैल झाल्याने दोन तारांत घर्षण होऊन ठिणग्या पडत आहेत,

गजानननगरात वीज,रस्त्याची बोंब
औरंगाबाद : गजानननगरातील गल्ली नं. ४ व ५ मध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा योग्य क्षमतेच्या नसल्याने व त्या सैल झाल्याने दोन तारांत घर्षण होऊन ठिणग्या पडत आहेत, तर अस्वच्छतेने आरोग्यावर परिणाम होऊन अनेक बालके तापाने फणफणली असल्याची ओरड स्थानिक नागरिकांतून होत आहे.
या वॉर्डात जीटीएलचा मोठ्या क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या कडेला धोकादायकपणे उघडा असून, मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते. तसेच या भागातील गल्ली नं. ४ आणि ५ मधील नागरिकांना ट्रान्सफॉर्मरजवळूनच सतत ये-जा करावी लागते. गल्लीतील एकाच खांबावरून अनेक जोडण्या घेतल्या असल्याने तो रस्त्यावर झुकला आहे.
अधिकारी म्हणतात...
जीटीएलचे संपर्क अधिकारी समीर पाठक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, धोकादायक तारा हटवून त्या ठिकाणी सुरक्षित केबल टाकून सेवा देऊ, कॉलनीचे सर्वेक्षण करण्यासाठी टीमला पाठविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.