दोन हजारांवर गावगुंड पोलिसांच्या ‘हीटलिस्ट’वर !

By Admin | Updated: October 14, 2014 00:34 IST2014-10-13T22:45:23+5:302014-10-14T00:34:49+5:30

बीड : विधानसभा निवडणुक व लोेकसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत

Gavgund police's 'Hitlist' on two thousand! | दोन हजारांवर गावगुंड पोलिसांच्या ‘हीटलिस्ट’वर !

दोन हजारांवर गावगुंड पोलिसांच्या ‘हीटलिस्ट’वर !



बीड : विधानसभा निवडणुक व लोेकसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. तब्बल दोन हजार आरोपी नजरकैदेत असून त्यांना केवळ मतदानापुरतेच घराबाहेर पडता येणार आहे.
बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया करुन गुन्हेगारांवर जरब बसवली आहे. याशिवाय मतदान केंद्र आवारात थांबून मतदारांवर दहशत निर्माण करु पाहणाऱ्या गुंडांवरही पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. जिल्ह्यात २१६५ इतके मतदान केंद्रे आहेत. १८ लाख १७ हजार ७७९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदान प्रक्रिया निर्धोक वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांवर दबाव टाकणे, मारहाण करणे, धमकावणे असे प्रकार होऊ नयेत यासाठी गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर पोलिस करडी नजर ठेवणार आहेत. मारामारी, गुंडागर्दी, खून, बलात्कार, दरोडे, चोऱ्या, प्राणघातक हल्ला अशा प्रकरणांमधील दोन हजाराहून अधिक आरोपी नजरकैदेत राहणार आहेत. त्या सर्वांना केवळ मतदानासाठी घराबाहेर पडता येईल. मतदान झाल्यावर त्यांना पुन्हा घरात येऊन बसावे लागेल. याउपरही कोणी नियमबाह्यपणे घराबाहेर आढळल्यास त्याला जेरबंद केले जाईल. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेची जय्यत तयारी करण्यात आली आहे़
४मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. स्थानिक पोलिसांच्या जोडीला बाहेर राज्यातील पोलिस राहणार आहेत. संवेदनशील मतदानकेंद्रांवर जादा बंदोबस्त राहील.
४मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
मतदान सुरु असताना गडबड, गोंधळ करण्याचा प्रयत्न केला किंवा तसा संशय जरी आला तरी पोलिस कुठल्याहीक्षणी संबंधितास उचलतील. मतदान केंद्र आवारात १४४ कलम लागू राहील. त्यामुळे शंभर मीटरच्या आवारात मतदानाव्यतिरिक्त प्रवेश राहणार नाही. मतदानकेंद्राबाहेर देखील पोलिसांची प्रत्येक हालचालींवर करडी नजर राहणार आहे.
मतदानप्रक्रिया सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी योग्य उपाययोजना केल्या आहेत.
४पोलिस प्रशासन कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहे.
४मतदानवेळी कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गय केली जाणार नाही.
४मतदानकेंद्रांवरील हालचाली टिपण्यासाठी साध्या वेशातील पोलिस राहणार आहेत. शिवाय चित्रीकरणही होणार आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Gavgund police's 'Hitlist' on two thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.