शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'गौरव यात्रा सन्मानाची,वज्रमूठ सभा अवमानाची'; भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचा दावा

By शांतीलाल गायकवाड | Updated: April 1, 2023 13:51 IST

सच्चा हिंदूत्ववादी महाविकास आघाडीच्या सभेला जाणार नाही

छत्रपती संभाजीनगर: आम्ही महापुरूषांच्या गौरवासाठी यात्रा काढत आहोत. तर ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर हिंदूऱ्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वाचा हुंकार भरला त्याच मैदानावर उद्या महाविकास आघाडीची सभा होत असून तो बाळासाहेबांचा अवमान आहे, अशी टिका केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपाचे नेते व पालक मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी शनिवारी पत्रकार परिषदेत एकसुरात केली.

डॉ. कराड म्हणाले, कॉग्रेस नेते राहूल गांधी हे सतत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचा अवमान करत असून त्यांचा निषेध आम्ही नोंदविला आहेच. सोबतच सावरकरांचे ज्वाजल्य देशप्रेम व हिंदूत्वाची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी भाजपा व शिवसेनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा रविवारी सायंकाळी शहरातून काढण्यात येणार आहे. समर्थनगरातील सावरकर यांच्या पुतळ्यास वंदन करून या यात्रेस सुरवात होईल.पत्रकार परिषदेला मराठवाडा यात्रा प्रमुख संजय केणेकर व आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह सहकार मंत्री अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, डॉ. राम बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाकरेंनी सावरकरांना वंदन करण्यास यावे- पालकमंत्रीसावरकरांचा अवमान करणाऱ्या काॅग्रेस नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावले आहे. त्यांनी उद्या गौरव यात्रेत येऊन सावरकरांना अभिवादन करावे, आम्ही त्यांचे स्वागत करू. येतांना त्यांच्या दोन्ही सहकारी पक्षासही घेऊन यावे, असा चिमटाही पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी काढला.

हे दुर्देवच म्हणावे: केणेकरजे मैदान बाळासाहेबांनी गाजवले. तेथे गर्दीचे विक्रम केले. त्यांचे विक्रम काॅग्रेस व राष्ट्रवादीना सोबत घेऊन उद्धव ठाकरे मोडणार आहेत, हे दुर्देवच म्हणावे, अशी टिका भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद