शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्ववान सखींचा पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:25 IST

विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाºया महिलांचा सखी सन्मान गौरव पुरस्कार देऊन गुरुवारी एका भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. थाटात संपन्न झालेल्या या सोहळ्यात ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरुन कौतुक केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाºया महिलांचा सखी सन्मान गौरव पुरस्कार देऊन गुरुवारी एका भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. थाटात संपन्न झालेल्या या सोहळ्यात ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरुन कौतुक केले.लोकमत सखीमंचच्या वतीने महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाभरात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, औद्योगिक- व्यावसायिक, सांस्कृतिक- साहित्यिक, शौर्य आदी गटात अतुलनीय कामगिरी करणाºया महिलांचा गौरव करण्यासाठी सखी सन्मान पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव ‘लोकमत’ कार्यालयाकडे दाखल झाले. छाननी समितीने केलेल्या निवडीनंतर विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात सखी सन्मान गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.राहुल पाटील यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.विजय भांबळे, पोलीस उपाधीक्षक सुधाकर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी ज्योती बगाटे, साई बेन्टेक्स ज्वेलरीचे बालासाहेब घिके, मंगलाताई घिके यांची उपस्थिती होती. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जया बाळासाहेब जाधव यांना तर क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल राज्य व राष्ट्रीय पातळीवर खो-खो व मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून परभणीचे नाव उंचावणाºया दीपाली सुक्रे या खेळाडूचा गौरव करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून गायन करणाºया आशा अशोकराव जोंधळे यांचा तर सामाजिक क्षेत्रात ३१७ महिला गटांच्या माध्यमातून ४ हजार ३१४ महिलांचे संघटन करुन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाची भूमिका बजावणाºया जयश्री उत्तमराव टेहरे यांचा गौरव करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात एचआयव्ही बाधित महिलांसाठी गेल्या १० वर्षांपासून विविध शिबिरे घेऊन मार्गदर्शन करणाºया व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणाºया डॉ.दीपाली सुधीर काकडे यांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शौर्य पुरस्कार जम्मू काश्मिर येथे काही दिवसांपूर्वी शहीद झालेले जवान बालाजी अंबोरे यांच्या वीर पत्नी अंजना बालाजी अंबोरे यांना प्रदान करण्यात आला. तसेच पाण्याच्या हौदात पडलेल्या चार वर्षीय अवंती या बालिकेचा जीव वाचविणाºया र्निमयी मुळी या सहा वर्षीय चिमुकलीचा यावेळी प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. गेल्या १८ वर्षांपासून स्व: कर्तृत्वाने कापड व्यवसायाच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण करुन त्यांना उच्चपदावर नोकरी मिळवून देण्यासाठी खटाटोप करणाºया सेलू येथील यशस्वी उद्योजिका चंदा मेहता यांचाही यावेळी उद्योजक या गटातून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन, दूरचित्रवाहिन्या आदींच्या माध्यमातून स्त्रियांच्या प्रश्नांवर लिखाण करणाºया व बाजू मांडणाºया लेखिका सरोज चंद्रकांत देशपांडे यांचा यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रत्येक गटातून द्वितीय क्रमांकावर असलेल्या महिला सदस्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा नियोजन अधिकारी ज्योती बगाटे यांनी ‘लोकमत’च्या वतीने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे यांनी तर कार्यक्रमाची भूमिका शाखाधिकारी मोहन शिंदे यांनी विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी तर आभार मोहन बोराडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे प्रायोजक साई बेन्टेक्सचे बालासाहेब घिके होते.