गेवराईत पकडला दीड लाखांचा गुटखा
By Admin | Updated: July 20, 2014 00:35 IST2014-07-19T23:59:51+5:302014-07-20T00:35:15+5:30
बीड: गेवराई शहरात प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी एस.ए. खिरडकर यांच्या पथकाने चार चाकी वाहनासह त्यातील दीड लाख रुपयांचा गुटखा शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पकडला.

गेवराईत पकडला दीड लाखांचा गुटखा
बीड: गेवराई शहरात प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी एस.ए. खिरडकर यांच्या पथकाने चार चाकी वाहनासह त्यातील दीड लाख रुपयांचा गुटखा शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पकडला. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कैलास लोहिया रा. धनगरनगर, गेवराई व कार चालक राजू काळे रा. गेवराई अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी एस.ए. खिरडकर यांच्या पथकास गेवराई शहरातून बीड येथे गुटखा विक्री करण्यासाठी पाठविला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. गेवराई शहरातून सकाळी साडेपाचच्या दरम्यान कार क्र एमएच-१४-५५५३ मधील डिक्कीमध्ये विविध कंपन्यांचा गुटखा विक्रीसाठी घेऊन जात होते. कारची तपासणी केली असता त्यात दहा गोण्या, जवळपास दीड लाख रुपयांचा गुटखा मिळून आला. गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाब्यावर टाकली धाड
बीड शहरापासून नजीक असलेल्या पाली येथील मंथन नामक धाब्यावर खिरडकर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री धाड टाकून तीन हजार रुपयांचा देशी-विदेशी दारु जप्त केली. (प्रतिनिधी)