बंधाऱ्यांचे दरवाजे गायब
By Admin | Updated: November 19, 2015 00:21 IST2015-11-19T00:03:13+5:302015-11-19T00:21:44+5:30
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील धामणा या नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे गायब झाल्याने हजारो लीटर पावसाचे पाणी वाहून गेले आहे

बंधाऱ्यांचे दरवाजे गायब
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील धामणा या नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे गायब झाल्याने हजारो लीटर पावसाचे पाणी वाहून गेले आहे. ज्या उद्देशासाठी बंधाऱ्यांची उभारणी केली त्याच उद्देशाला हारताळ फासण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे काही वर्षापूर्विच बांधकाम करण्यात आले. होते.
कोल्हापुरी बंधारा काही वर्षांपूर्वी बांधला होता त्यावेळी पाणी अडवण्यासाठी दरवाजे बसवले होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील दरवाजेच गायब झाले असून, पावसाचे पाणी वाहून जात आहे.
विशेष म्हणजे येथे शेजारीच एक निजामकालीन बंधारा आहे. जुन्या फाडयात पक्के बांधकाम झाले आहे. तो अजुनही तग धरुन आहे. या शेजारीच दुसरा नवा कोल्हापुरी बंधारा असून, त्याला दरवाजेच नसल्यामुळे गुराढोरांनाही पाणी पिणे मुश्कील बनले आहे. शासनाचे यामुळे पैसे वाया गेल्याचे दिसते आहे. पाणी अडले तर त्याचा फायदा परंतु पाणीच अडविले जात नाही तर काय फायदा , असा सवालही शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांनाही याचा काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. आता नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे पुढे या नदीवरच पदमावती धरण आहे.पंरतु पाणी अडवले जात नसल्याने याचा उपयोग होताना दिसून येत नाही.