पोलीस वसाहतीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:31 IST2017-09-07T00:31:33+5:302017-09-07T00:31:33+5:30
येथील पोलीस वसाहतीतील एका निवासस्थानात बुधवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला़ दरम्यान पोलीस कर्मचाºयाने सतर्कता दाखवित शेगडीसह गॅस सिलिंडर घराबाहेर नेऊन टाकल्याने मोठा अनर्थ टळला़

पोलीस वसाहतीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील पोलीस वसाहतीतील एका निवासस्थानात बुधवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला़ दरम्यान पोलीस कर्मचाºयाने सतर्कता दाखवित शेगडीसह गॅस सिलिंडर घराबाहेर नेऊन टाकल्याने मोठा अनर्थ टळला़
पोलीस वसाहतीमध्ये प्रभावती शाळेच्या गेटजवळ पोलीस कर्मचारी भानुदास पवार यांचे वाय ९ या क्रमांकाचे निवासस्थान आहे़ ६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पवार यांच्या घरी स्वयंपाक सुरू होता़ यावेळी स्वत: भानुदास पवार, त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे सर्वच कुटुंबिय घरात होते़ भानुदास पवार हे अलीकडच्या खोलीत असताना स्वयंपाक घरात काही तरी आवाज झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ आत जाऊन पाहिले असता सिलिंडरने पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ रेग्युलेटर बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ परंतु, ते जॅम झाले होते़ त्यामुळे सतर्कता दाखवित पवार यांनी शेगडीसह सिलिंडर घराच्या बाहेरील अंगनात नेवून टाकले़ घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले़ काही वेळातच सिलिंडरचा मोठा स्फोट झाला़ हा स्फोट एवढा मोठा होता की, सिलिंडरचे दोन तुकडे झाले. स्फोटाचा आवाज दीड किमी अंतरापर्यंत पोहोचेल एवढा मोठा होता़ या घटनेमुळे संपूर्ण पवार कुटुंबिय घाबरून गेले होते़ दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले़ परभणी शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल सांगळे, यांच्यासह डीएसबीचे मुजमुले, नितीन वडकर, गणेश पुरी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावून आले़ या घटनेमुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़ पवार यांच्या सतर्कतेमुळेच मोठा अनर्थ टळला़