भाविकांची गैैरसोय
By Admin | Updated: November 10, 2016 00:01 IST2016-11-10T00:04:25+5:302016-11-10T00:01:34+5:30
तुळजापूर पाचशे व एक हजार रूपयांच्या नोटांना शासन निर्णयामुळे कवडी किंमत आल्याने तीर्थक्षेत्र तुळजापुरातील ७५ टक्के व्यवहारावर परिणाम झाला़

भाविकांची गैैरसोय
गोविंद खुरूद तुळजापूर
पाचशे व एक हजार रूपयांच्या नोटांना शासन निर्णयामुळे कवडी किंमत आल्याने तीर्थक्षेत्र तुळजापुरातील ७५ टक्के व्यवहारावर परिणाम झाला़ हॉटेल, प्रसादिक दुकानांसह इतर ठिकाणी ‘नोटा नको चिल्लर द्या’ अशी मागणी होवू लागल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागला़ तर शहरातील दैनंदिन होणाऱ्या व्यवहारापैकी जवळपास ७५ टक्के व्यवहाराला याचा फटका बसल्याचे दिसून आले़
केंद्र शासनाच्या पाचशे व एक हजार रूपयांच्या नोटांबाबतच्या निर्णयानंतर शहरातील बाजारपेठ, मुद्रांक नोंदणी कार्यालय, धाबे, किराणा दुकान, हॉटेल व प्रासादिक दुकान यांचे ७५ टक्केपेक्षा कमी व्यवहार झाले़ शासन निर्णयामुळे तीर्थक्षेत्र तुळजापुरात बुधवारी भाविकांची संख्याही कमी दिसून आली़ आलेल्या भाविकांना शंभर व पन्नास रुपयांचा नोटांअभावी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला़ काही लॉज चालक व हॉटेल मालकांनी भाविकांची अडचण ओळखून पाचशे व हजाराच्या नोटा स्विकारल्या. परंतु किराणा दुकानदार, प्रासादिक दुकानदार, टपरीवाले, फळ विक्रेते यांनी पाचशे व हजाराची नोट स्विकारल्या नसल्याने ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागला़ दरम्यान, केंद्र शासनाच्या निर्णयामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात दररोजच्या पेक्षा खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी झाले. अशी माहिती निबंधक अधिकारी कोकाटे यांनी दिली़