शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

भाजीच्या दुकानांसमोरच कचऱ्याचे ढिगारे

By admin | Updated: December 5, 2014 00:53 IST

परळी : शहरातील उड्डाणपूलावरुन उतरताच सुभाष चौक रोडकडे निघालेल्या नागरिकांना व दुचाकीधारकांना सामना करावा लागतो तो खांडे पूल, भाजी मार्केटसमोरील अस्वच्छतेचा.

परळी : शहरातील उड्डाणपूलावरुन उतरताच सुभाष चौक रोडकडे निघालेल्या नागरिकांना व दुचाकीधारकांना सामना करावा लागतो तो खांडे पूल, भाजी मार्केटसमोरील अस्वच्छतेचा. या परिसरात नाल्यावरच कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. परळी नगर परिषदेने खांडी पूल नाल्यावर व्यापारी संकुल व भाजी मार्केट काढले आहे. या भाजी मार्केट समोरील पुलाजवळ नियमितपणे कचऱ्याचा ढिग आढळून येतो. या भागातून थर्मलकडे व थर्मलकडून परळी शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या भागात स्वच्छता करावी, अशी मागणी माजी नगरसेवक ज्ञानोबा आघाव, सामाजिक कार्यकर्ते नीलेश जगतकर, सोमनाथ गडेकर, साईनाथ मस्के यांनी केली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी वैद्यनाथ हे एक ज्योतिर्लिंग असल्याने दर्शनासाठी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेर राज्यातील भाविकही दर्शनासाठी येत असल्याने शहरात स्वच्छता ठेवली पाहिजे. असे झाले तरच परळीचे नाव दुसऱ्या राज्यातही चांगले व स्वच्छ शहर म्हणून काढले जाईल. गंगाखेड-बीड या मार्गाने येणारे भक्त परळीत उड्डाणपूल, खांडी पूलावरून येतात. त्यांना घाणीचा सामना करतच शहरात यावे लागते. खांडी पूल नाल्यावर घाण व कचरा फेकण्यात येत आहे. समोरच भाजी विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे त्यांना याचा नेहमीच सामना करावा लागतो.गल्लोगल्लीत स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली आहे. हा परिसर स्वच्छ करण्यात येईल, असे न.प.ने सांगितले. (वार्ताहर)