वडगावात गॅरेज चालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:56 IST2019-03-23T22:56:37+5:302019-03-23T22:56:47+5:30

किरकोळ कारणावरुन ४५ वर्षीय गॅरेज चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी वडगाव कोल्हाटी येथे घडली. याप्रकरणी दोघा भावाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Garage driver in Wadga hit | वडगावात गॅरेज चालकास मारहाण

वडगावात गॅरेज चालकास मारहाण

वाळूज महानगर : किरकोळ कारणावरुन ४५ वर्षीय गॅरेज चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी वडगाव कोल्हाटी येथे घडली. याप्रकरणी दोघा भावाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाळासाहेब हरिभाऊ केदारे (४५) हे पत्नी व तीन मुलींसह वडगाव कोल्हाटी येथे वास्तव्यास आहेत. घराशेजारीच बाळासाहेब केदारे यांनी गॅरेज सुरु करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. केदारे यांची मुलगी पल्लवी हिला शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारी राणी टोपे हिने खरकटे टाकण्यावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. बाळासाहेब केदारे हे मध्यस्थीसाठी गेले असता राणीचा पती निलेशने केदारे यांना मारहाण केली. मयूर टोपे यानेही त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.या प्रकरणी निलेश टोपे व मयुर टोपे याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Garage driver in Wadga hit

टॅग्स :Walujवाळूज