काळ्या बाजारात जाणारा गहू पोलिसांनी पकडला!
By Admin | Updated: March 14, 2016 00:31 IST2016-03-14T00:10:25+5:302016-03-14T00:31:44+5:30
परतूर : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला असून, यामध्ये पन्नस कट्टे गहू असल्याचे सांगण्यात येते.

काळ्या बाजारात जाणारा गहू पोलिसांनी पकडला!
सोलापूर:
महसूल प्रशासनाने नजर आणेवारीवरुन केलेली यादी मान्य करीत महसूल मंत्र्यांनी जिल्?ातील दुष्काळी गावांची यादी जाहीर केली. 15 मार्चनंतर पीक कापणी प्रयोगानंतर नव्या गावांचा या दुष्काळी गावांच्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.
महसूल प्रशासनाने रब्बी हंगामाची पेरणी झाल्यानंतर 31 डिसेंबर रोजी पेरणी झालेल्या क्षेत्राची माहिती सादर केली. या माहितीच्या आधारे बनवलेल्या यादीतील गावे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात दुष्काळी गावे म्हणून जाहीर केली. 31 जानेवारी रोजी याच महसूल प्रशासनाने सुधारित पैसेवारीची यादी घोषित केली. काही तालुक्यांत सुधारित यादीमुळे नव्या गावांची भर पडली. 15 मार्च रोजी पीक कापणी प्रयोगानंतरची गावांची यादी अंतिम यादी म्हणून ग्रा? धरण्यात येणार आहे. सुधारित यादीत त्यामुळे भर पडणार आहे. शासनाने जाहीर केलेली यादी नजर आणेवारीची आहे. अंतिम यादीत नवी गावे समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
अक्कलकोट तालुक्यात नजर आणेवारीत 101 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी होती. सुधारित आणेवारीत ती 113 झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यात नजर आणेवारीत 56 गावे 50 पैशांपेक्षा कमी आणेवारीची होती. सुधारित आणेवारीत ती 58 गावे झाली. वगळलेल्या 32 गावांपैकी अंतिम आणेवारीत आणखी गावे दुष्काळी यादीत समाविष्ट होऊ शकतात.
इन्फो बॉक्स
50 पैशांपेक्षा कमी आणेवारीची गावे (सुधारित यादी)
अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दहिटणे, हसापूर, बासलेगाव, नागनहळ्ळी, मातनहळ्ळी, काळेगाव, ममदाबाद, कोळीबेट, उमरगे, मिरजगी, गौडगाव (खु.), निमगाव, गळोरगी, कंठेहळ्ळी, इटगे, रामपूर, वागदरी, खैराट, भुरीकवठे, गोगाव, शिरवळ, शिरसी, सदलापूर, शिरवळवाडी, बादोले (बु.), बादोले (खु.), साफळे, सांगवी (बु.), सांगवी (खु.), चपळगाव, बावकरवाडी, डोंबरजवळगे, बर्हाणपूर, पितापूर, अरळी, दर्शनाळ, बोरेगाव, अकतनाळ, हन्नूर, नन्हेगाव, कोन्हाळी, चपळगाववाडी, दहिटणेवाडी, कर्जाळ, हालहळ्ळी, ब्यागेहळ्ळी, मैंदर्गी, भोसगे, तोरणी, संगोगी, सलगर, हत्तीकणबस, बणजगोळ, चिक्केहळ्ळी, उटगी, जकापूर, सातनदुधनी, कल्लप्पावाडी, हालहळ्ळी (मैं.), दुधनी, सिन्नूर, मुगळी, रुद्देवाडी, इब्राहिमपूर, नागूर, बोरोटी (बु.), बोरोटी (खु.), संगोगी (ब.), तळेवाड, बिंजगेर, बबलाद, आंदेवाडी (ज.) चिंचोळी (मैं.), जेऊर, जैनापूर, जेऊरवाडी, हंजगी, हालचिंचोळी, दोड्याळ, कडबगाव, गौडगाव (बु.), सेवालालनगर, नाविंदगी, नागणसूर, मराठवाडी, गुरववाडी, तोळणूर, हैद्रा, करजगी, सुलेरजवळगे, मंगरुळ, कलहिप्परगे, घुंगरेगाव, हंद्राळ, आंदेवाडी (बु.), आंदेवाडी (खु.), शावळ, किणी, काझी कणबस, किणीवाडी, कुरनूर, मोट्याळ, सिंदखेड, बोरगाव (दे.), पालापूर, घोळसगाव, किरनळ्ळी, चुंगी, सुलतानपूर, रामतीर्थ या 113 गावांचा सुधारित यादीत समावेश आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात 58 गावे
सुधारित पैसेवारीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यात 58 गावांचा समावेश करण्यात आला. त्यात बोरामणी, मुळेगाव, दोड्डी, बक्षीहिप्परगे, मुळेगाव तांडा, वरळेगाव, वडजी, उळे, उळेवाडी, वळसंग, कुंभारी, तोगराळी, गुर्देहळ्ळी, हणमगाव, आचेगाव, शिंगडगाव, कणबस (गं.), शिरवळ (जै.), इंगळगी, बोरुळ, औज (आ.) आलेगाव, तिल्हेहाळ, मंद्रुप, बसवनगर,