बालमंच सदस्यांसाठी गणपती सजावट स्पर्धा
By Admin | Updated: September 2, 2014 23:59 IST2014-09-02T23:53:53+5:302014-09-02T23:59:38+5:30
हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंचकडून आयोजित ‘गणपती सजावट’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सदस्यांना ३ सप्टेंबरची शेवटची संधी देण्यात आली आहे.

बालमंच सदस्यांसाठी गणपती सजावट स्पर्धा
हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंचकडून आयोजित ‘गणपती सजावट’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सदस्यांना ३ सप्टेंबरची शेवटची संधी देण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांच्या घरी जाऊन सजावटीचे फोटो काढण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या विजेत्यासाठी १००१ तर द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना ७०१ आणि ५०१ रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवाय ४०१ रूपयांचे दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. इच्छुक सदस्यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत ‘लोकमत’ कार्यालयात किवा ९८८१९५४९१७ या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. प्रायोजकत्व श्री सार्वजनिक गणेश मंडळाने स्वीकारले आहे.
सखींसाठीही स्पर्धा
हिंगोली आणि वसमत सखींसाठी महालक्ष्मी आरास सजावट स्पर्धेत भाग घेण्यासाठी संखींना बुधवारपर्यंत नाव नोंदणी करावी लागणार आहे. पहिल्या तीन विजेत्या सखींना पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवाय उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेही आहेत. स्पर्धेचे प्रायोजकत्व मानस राखी व वैैष्णवी लेडिज कलेक्शन अॅण्ड गिफ्ट सेंटरने स्वीकारले आहे. (प्रतिनिधी)