दरोडेखोरांची टोळी ग्रामस्थांकडून जेरबंद

By Admin | Updated: June 29, 2014 00:45 IST2014-06-29T00:41:50+5:302014-06-29T00:45:10+5:30

अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव शिवारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार २७ जून रोजी रात्री १० च्या सुमारास घडला.

The gangsters of the dacoits ransacked | दरोडेखोरांची टोळी ग्रामस्थांकडून जेरबंद

दरोडेखोरांची टोळी ग्रामस्थांकडून जेरबंद

अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव शिवारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार २७ जून रोजी रात्री १० च्या सुमारास घडला.
दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना शेतवस्तीवर राहत असलेल्या कुटुंबातील काही सदस्यांनी पाहिले. त्यांनी आरडोओरड सुरू केल्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून पळून जाऊ लागले. हा प्रकार पाहून शेतवस्तीसह गावातील लोकांनी त्यांचा पाठलाग करून गावाच्या पाटीवर तिघांना पकडले. त्यांचे अन्य सोबती पळून जाण्यात यशस्वी ठरले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये भोकरदन येथील डिस्को मासेभान पवार (३२), रमेश सिकलोक जाधव (३५), साकलसिंग सारंगधर भोसले (२८) यांचा समावेश आहे. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली. सहायक निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, गिरी, राठोड, एस.आय. जोशी, टी.एस. सातपुते, मोहिते, जावळे आदींनी तात्काळ घटनास्थळ गाठले. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The gangsters of the dacoits ransacked