महिलेवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:14 IST2017-11-10T00:14:11+5:302017-11-10T00:14:34+5:30

चिंचोली माळी फाट्याजवळील साळेगाव शिवारात शेतात राहणा-या महिलेवर ओळखीच्याच रामचंद्र संदिपान खांडेकर व विठ्ठल हनुमंत कुरवडे (रा.कोल्हेवाडी) यांनी दुचाकीवर घेऊन जात अत्याचार केला.

Gangrape near Kej | महिलेवर सामूहिक अत्याचार

महिलेवर सामूहिक अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
केज: केज-कळंब राज्य महामार्गालगत असलेल्या चिंचोली माळी फाट्याजवळील साळेगाव शिवारात शेतात राहणा-या महिलेवर ओळखीच्याच रामचंद्र संदिपान खांडेकर व विठ्ठल हनुमंत कुरवडे (रा.कोल्हेवाडी) यांनी दुचाकीवर घेऊन जात अत्याचार केला. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विवाहिता कुटूंबासह साळेगाव शिवारात हिश्याने केलेल्या शेतात राहते. तिची कोल्हेवाडी येथील विठ्ठल व संदिपान या दोघांसोबत ओळख झाली. त्यांनी तिला मुंबईला पळवून नेले. रस्त्यातच तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच मुंबई येथेही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर हे दोन्ही नराधम पीडित महिलेस मुंबईतच सोडून फरार झाले. ज्या घरात हा अत्याचार झाला, त्या घराच्या मालकिणीच्या मदतीने पीडिता साळेगावला आली. हा प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिने केज पोलीस ठाणे गाठून या दोन्ही नराधमांविरोधात फिर्याद दिली.

Web Title: Gangrape near Kej