गंगापूर पोलिसांनी अवैध दारूसह कार केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:04 IST2021-05-18T04:04:32+5:302021-05-18T04:04:32+5:30

गंगापूर : तालुक्यातील महालक्ष्मी खेडा गावात विनापरवाना दारू घेऊन जाणाऱ्या दोघांवर गंगापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १७ ...

Gangapur police seized a car with illegal liquor | गंगापूर पोलिसांनी अवैध दारूसह कार केली जप्त

गंगापूर पोलिसांनी अवैध दारूसह कार केली जप्त

गंगापूर : तालुक्यातील महालक्ष्मी खेडा गावात विनापरवाना दारू घेऊन जाणाऱ्या दोघांवर गंगापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १७ हजार रुपयांच्या ८० विदेशी दारूच्या बाटल्या व कार जप्त केली आहे. कानिफनाथ माणिक मावस (३२, रा. भिवधानोरा) व शुभम नामदेव पवार (१९, रा. महालक्ष्मी खेडा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महालक्ष्मी खेडा येथे पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेचार वाजता धाड टाकून उभ्या असलेल्या कार क्रमांक (एमएच ०२ एएल ३६३३)मधून विदेशी दारूच्या ८० बाटल्या तसेच अंदाजे ७० हजार रुपये किमतीची कार जप्त केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित पाटील, हरिश्चंद्र नरके, दत्तात्रय गुंजाळ यांनी केली.

170521\jayesh nirpal_img-20210517-wa0054_1.jpg

Web Title: Gangapur police seized a car with illegal liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.