गंगापूर रुग्णालयाला मिळाली नवीन रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:03 IST2021-04-16T04:03:56+5:302021-04-16T04:03:56+5:30

: ग्रामीण रुग्णालयासाठी अनेक दिवसांपासून अतिरिक्त रुग्णवाहिकेची मागणी प्रलंबित होती. त्यातच ८ एप्रिलला ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका वाळूज येथे जळून ...

Gangapur Hospital gets new ambulance | गंगापूर रुग्णालयाला मिळाली नवीन रुग्णवाहिका

गंगापूर रुग्णालयाला मिळाली नवीन रुग्णवाहिका

: ग्रामीण रुग्णालयासाठी अनेक दिवसांपासून अतिरिक्त रुग्णवाहिकेची मागणी प्रलंबित होती. त्यातच ८ एप्रिलला ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका वाळूज येथे जळून खाक झाल्याने रुग्णांना इतरत्र उपचारासाठी नेताना अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी निधीतून गंगापूर ग्रामीण रुग्णालयास नवीन रुग्णवाहिका दिली. यासह कोरोना केंद्राला, देवरी ग्लोबल येथील रुग्णांसाठी व वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, स्वच्छता साधन, मास्क, सॅनिटायझर आदी अत्यावश्यक वस्तूची किट सुद्धा देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार, नगरसेवक प्रदीप पाटील, भाग्येश गंगावाल, रुग्ण कल्याण समितीचे अतुल रासकर, प्रशांत मुळे, मंगेश गायकवाड, नितीन पदार, योगेश हारने आदी उपस्थित होते.

-- कॅप्शन : गंगापूर रुग्णालयास मिळालेली रुग्णवाहिका. सोबत कर्मचारी व पदाधिकारी.

150421\jayesh nirpal_img-20210415-wa0068_1.jpg

गंगापूर

Web Title: Gangapur Hospital gets new ambulance