चोरट्यांची टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:45 IST2017-09-12T00:45:36+5:302017-09-12T00:45:36+5:30

भाग्यनगरसह शहरभरात रस्त्याने पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळणाºया सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत़

The gang of thieves caught | चोरट्यांची टोळी पकडली

चोरट्यांची टोळी पकडली

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: भाग्यनगरसह शहरभरात रस्त्याने पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळणाºया सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत़
काबरानगर येथील मालती मधुकरराव वैद्य या पती व मुलासह ३० मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पायी जात असताना, दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले़ यावेळी त्यांनी मालतीबाई यांच्या गळ्यातील ८४ हजार रुपये किमतीचे गंठन हिसकावून पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ त्यापूर्वीही भाग्यनगरसह अनेक भागात दुचाकीस्वारांनी अशाप्रकारे सोनसाखळी लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या़ याबाबत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्यासह उपअधीक्षक अभिजित फस्के यांनी सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोनि़ चंद्रशेखर कदम यांना दिल्या़ त्यानुसार पोउपनि चंद्रकात पवार, पोना सुभाष आलोने, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड यांचे पथक गेल्या अनेक महिन्यांपासून सोनसाखळी चोरट्यांच्या शोधात होते़
एका खबºयाकडून पोउपनि पवार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेच विक्की उर्फ चिक्की संजय सूर्यवंशी (रा़आंबेडकरनगर) व शेख मुजाईद शेख अफसर (रा़मकदुमनगर) या दोघांना ताब्यात घेतले़ सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाºया या दोघांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली़ हे दोघेही सराईत चोरटे असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ या प्रकरणाचा तपास पोउपनि संगीता कदम व पोकॉ़ सुमेध पुंडगे हे करीत आहेत़

Web Title: The gang of thieves caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.